शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर.जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपी २४ तासात केले जेरबंद, आरोपींना मुंबई येथून अटक,आरोपींकडून १ लाख ९० हजार/- रुपये किचा मुद्देमाल जप्त.

दि.०२/०२/२०२४ रोजी फिर्यादी टॅक्सी कॅब ड्रायव्हर हे त्याचेकडील प्रवासी घेवुन जात असताना चार अनोळखी इसमांनी त्याची गाडी अडवुन, फिर्यादीस मारहाण करुन जबरदस्तीने त्याचेकडील मोबाईल फोनवरून ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून, त्याचेकडील मोबाईल व सोन्याची चेन जबरी चोरी करून नेली होती. सदरबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने केलेल्या ट्रान्झेक्शनवस्न तसेच तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने मागोवा घेवुन, सदरचे संशयीत आरोपी हे दादर, मुंबईला असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाचे पोउपनि अजित बडे यांचेसह तपास पथकाला तात्काळ मुंबई येथे रवाना केले. सदर संशयीत आरोपी हे मुंबई मध्ये सतत जागा बदलत असल्याचे दिसुन येत होते. त्यांचा सातत्याने पाठलाग करून चारही आरोपींना दि.०३/०२/२०२४ रोजी सांताक्रुझ रेल्वे स्टेशन परीसरातुनते मुंबई मधून मध्य प्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यातील आरोपी १) पियुष राजेश मरोठे, वय-२२, रा. वानवडी गांव, पुणे २) प्रणय आनंद लोंढे, वय-१८, रा. तानाजीनगर चिंचवड, पुणे व वानवडी, पुणे (अटक) दोन विधीसंघर्षीत बालके (ताब्यात) यांचेकडुन चोरी केलेला मोबाईल फोन, सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटर सायकली देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांचे खात्या मध्ये पैसे जमा झाले ते खाते गोठवण्यात आले आहे. त्यांचेकडुन एकुण १,९०,०००/- रुपये किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- १, श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे श्री. वसंत कुंवर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत सपोनि बाजीराव नाईक, पोउपनि अजित बडे, सहा. पो. फौज. अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार, राजकिरण पवार, मिलींद काळे, गणपत वालकोळी, सतिश कुंभार, प्रविण धडस, गणेश जाधवर, अर्जुन कुडाळकर, तुकाराम म्हस्के यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments