शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, परिसरामध्ये एक इसम पायी जात असताना, २ मोटर सायकलवर ४ मुलांनी येऊन फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेले, अशी फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, त्या संदर्भात शिवाजीनगर पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे, सदर आरोपी मध्ये २ हे विधी संघर्षित बालक आहे पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.
दि.१४/०२/२०२४ रोजी एक इसम पायी जात असताना दोन मोटारसायकल वर चार मुलांनी येवुन तक्रारदार यांचा मोबाईल फोन हिसकावुन जबरीने चोरुन नेला होता. सदर बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सह भारतीय हत्यार कायद कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक सीसीटिव्ही फुटेज तपासुन आरोपीने गुन्हा करताना वापरलेली एक मोटर सायकल तिचे वरील खुणे मुळे निश्चित केली. तसेच पोलीस अंमलदार प्रविण धडस, सुदाम तायडे, स्पेश वाघमारे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने पोउपनि अजित बडे असे मनपा येथील ब्रिजखाली सापळा लावुन थांबले असता गुन्हा केलेले संशयीत आरोपी सीसीटिव्ही फुटेज मधील मोटारसायकल सह तेथे आले. तसेच बातमीदाराने दिलेली माहीती प्रमाणेच सदरचे संशयीत आरोपी असल्याने त्यांना ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यातील आरोपी १) चंद नंदु सरोदे वय १९ वर्षे रा.लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे २) सिध्देश विश्वास शेंडगे वय १८ वर्षे रा.लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे यांना अटक करुन व त्यांच्या सोबतच्या दोन विधी संघर्षित बालके यांच्या कडुन गुन्ह्यात जबरी चोरी केलेला मोबाईल, धारदार हत्यार, दोन मोटार सायकल असा एकुण १,००,२५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परी-१ श्री. संदिप सिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पो. निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सपोनि बाजीराव नाईक, पोउपनि अजित बडे, सपोउपनि अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार राजकिरण पवार, स्पेश वाघमारे, सुदाम तायडे, बशीर सैय्यद, प्रविण धडस, आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार स्वालेहा शेख यांनी केली आहे.
0 Comments