गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक १, पुणे शहर. शिरपुर जिल्हा धुळे येथील सिव्हील इंजिनिअर साथीदारासह पुण्यात गांजा विक्री करण्याकरीता आलेल्या इसमांना केली अटक २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त.एकूण ६ लाख ३२ हजार ५००/- चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.



दि.१३/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे त्यांचे स्टाफ सोबत पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही
इसम हे भारती विद्यापीठ कात्रज येथे गांजा विक्री करण्या करता येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी तात्काळ त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी सापळा रचुन इसम नामे १) हरीओम संजय सिंग वय २१ वर्षे, रा. बी.एस.एन.एल टॉवर मागे, मोहाडी बैंक ऑफ बडोदा जवळ, धुळे. २) करण युवराज बागुल वय २३ वर्षे, शिक्षण सिव्हिल इंजिनिअर रा, पदमावती कॉलनी मांडाळ शिवार प्लॉट नं. २, ता. शिरपुर जि. धुळे यांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यातुन एकुण ४,८३,८००/- रु किं.चा ऐवज त्यामध्ये ४,६१,८००/- रु किं.चा २३ किलो ९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व २२,०००/- रु किं.चे दोन मोबाईल फोन मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक तपास करता यातील इसम नामे हरीओम संजय सिंग हा इलेक्ट्रीक ची कामे करीत असुन त्याचेवर शिरपुर पो.स्टे.गु.र.नं.३५१/२०२२ आर्म अॅक्ट ३ (२५) व करण युवराज बागुल हा सिव्हिल इंजिनिअर असुन त्याचेवर शिरपुर पो.स्टे. गु.र.नं.१०९/२०२३ भा.द.वि.कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांनी सदरचा गांजा हा आंबेगाव बू। पुणे येथे राहणारा साथीदार नामे वसंत सुभाष क्षिरसागर यास पुणे परिसरात विक्री करीता देण्या करीता आणला असल्याचे सांगितले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी तात्काळ इसम नामे वसंत सुभाष क्षिरसागर रा. आंबेगाव बू। पुणे. याचा शोध घेतला असता इसम नामे वसंत सुभाष क्षिरसागर वय ३० वर्षे शिक्षण बी.बी.ए.रा. आंबेगाव बू। पुणे. हा त्याचे रहाते घरी मिळून आल्याने त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे जवळ कि रु ८४,७००/- चा ०४ किलो २३५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, किं.रु. ६२,०००/- चे दोन मोबाईल फोन, कि.रु २०००/- चा एक इलेक्टॉनिक वजन काटा,  रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा बंच असा ऐवज मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.

अशा प्रकारे तिघांकडे किं.रु. ८४,०००/- चे चार मोबाईल फोन, किं.रु २,०००/- चा एक इलेक्टॉनिक वजन काटा, रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा बंच, २७ किलो ३२५ ग्रॅम, गांजा हा अंमली पदार्थ किं. रु.६,३२,५००/- चा असा ऐवज संगणमताने अनाधिकाराने, बेकायदेशिर रित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले असल्याने वर नमूद आरोपी यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. १४१/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक झेंडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हे करीत आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, पांडुरंग पवार, मारुती पारधी, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, रेहना शेख, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments