सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर.उच्च शिक्षीत, व्यसनाच्या आधीन गेल्याने दुचाकी वाहने चोरणाऱ्या चोरास केले जेरबंद,१ लाख ९५ हजार/- किंमतीच्या ३ दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड.


दि.११/०२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की एक इसम चोरीची काळया रंगाची अॅक्टीव्हा गाडी हिच्यासह सावरकर चौक धनकवडी पुणे येथे थांबला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवुन त्यांचे परवानगीने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाकडील स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचा इसम हा गाडी वरून सावरकर चौकातुन पुढे जात असताना दिसल्याने लागलीच त्यास स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत प्रभाकर कान्हेकर वय ४७ वर्षे रा. बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यात एक अॅक्टीवा गाडी मिळुन आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी त्याने डीमार्ट पुणे सातारा रोड पुणे याठिकाणा वरून दि.०८/०२/२०२४ रोजी चोरल्याचे कबुल केले सदर गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. ४५/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले सदर आरोपी कडुन एकुण १,९५,०००/- रु किं.ची ३ वाहने हस्तगत करण्यात आली असुन सहकारनगर पोलीस ठाण्याकडील गु. रजि. नं. ४५/२०२४ भादवि ३७९ २) २३०/२०२३ भादवि ३७९ ३) ४९/२०२४ भादवि ३७९ असे ३ वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. सदर आरोपी वर चोरीचा १ गुन्हे विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, बजरंग पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, सागर कुंभार, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments