स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. २४/२०२४ भा.द.वि. कलम.३७९ मधील फिर्यादी नामे सुरेश बाळासो शिंदे वय ५७ वर्ष धंदा- नोकरी रा. चिखली पिपरी चिंचवड हे दिनांक २१/०१/२०२४ रोजी स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करुन दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना देवुन आदेशीत केले होते.
त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपासपथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील अंमलदार पोशि ८२३९ कांबळे व पोशि १००६२ शेख यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन तेथिल सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्याआधारे तसेच त्यांच्या गोपनिय बातमी वरुन अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता, स्वारगेट एस.टी. सटॅन्ड येथे एक संशयीत इसम दिसल्याने त्याचे दिशेने जाताच तो पळुन जावु लागल्याने पोलीस स्टाफच्या मदतीने त्याचा पाठलाग करुन त्याला घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता संतोष रामकृष्ण शंकपाळ वय ४९ वर्षे रा. सर्मीक विहार जैननगरी पिसादेवी औरंगाबाद असे असल्याचे सांगितले त्यानंतर त्यास पळुन जाण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे उजव्या बाजुचे पॅन्टचे खिशात एक अर्धवट तुटलेली सोन्याची चैन मिळुन आल्याने सदर चैन बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांने उडवाउडवीचे उत्तरे दिली. म्हणुन त्यास पोलीस ठाणेस आणुन त्यानंतर त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने सदरची चेन स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथेच चोरी केल्याचे कबुल केले. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे चेनचे वर्णन व त्याचे खिशात मिळुन आलेल्या सोन्याचे चेनचे वर्णन मिळते जुळते असल्याने त्याच्याकडुन दाखल ३०,०००/- रुपये किंमतीची अंदाजे ०७ ग्रॅम वजनाची अर्धवट तुटलेली सोन्याची चैन असा मुद्देमाल तपासा दरम्यान जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा.श्री. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. मा.श्रीमती नंदिनी वग्यानी सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड, श्रीमती संगीता पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उप- निरीक्षक प्रतापसिंह शेळके, पो.हवा. विजय कुंभार, पो. हवा. मुंढे, पो.ना. देवकाते, सोमनाथ कांबळे, सुजय पवार, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, प्रविण गोडसे, दिपक खंदाड, संजय मस्के, यांनी एकत्र मिळुन केली आहे.
0 Comments