खडकी पोलीस स्टेशन येथे विधीसंघर्षीत बालकांसाठी समुपदेशन शिबिर घेण्यात आले.


खडकी पोलीस स्टेशन येथे विधीसंघर्षीत बालकांसाठी समुपदेशन शिबिर घेण्यात आले.
सदर शिबिरात समुपदेशक श्रीमती मोरे मॅडम व पुनम गायकवाड  व बालकल्याण अधिकारी
खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शहाणे तसेच विधीसंघर्षीत
बालकांना व त्यांचे पालकांना समुपदेशन केले आहे.


विधीसंघर्षीत बालकांना गंभीर गुन्हयांपासुन परावृत्त करणेकरीता शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराच्या माध्यमातून खडकी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांनी विधी संघर्ष बालक व त्यांचे पालक यांना मार्गदर्शन केले,


राजेंद्र शहाणे यांनी उपस्थित बालक व त्यांच्या पालकांना कायदेविषयक माहीती देऊन शिक्षणाचे महत्व पटवुन सांगितले तसेच पालकांनी बालकां विषयी आपली जबाबदारी ओळखुन त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्याच्या सुचना दिल्या.

सद्या सोशल मिडीयाचा गैरवापर व त्याच्या माध्यामातुन वाढत्या बालगुन्हेगारी बाबत माहीती दिली.


अंमली पदार्थाचे वेसन त्यातुन वाढणारी व्यसनाधिनता, त्यासाठी लागणारे पैसे त्यामुळे गुन्हेगारी वाढते यासंदर्भात वरिष्ठांनी मार्गदर्शन केले,शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्व, व वाहतुकीचे नियम पाळावे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांनी बालकांना व त्यांचे पालकांना
त्यांच्या अडचणीची माहीती घेवुन त्यांना 
मार्गदर्शन करण्यात आले.

खडकी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे.

Post a Comment

0 Comments