भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.ॲपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणा-या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक.



आरोपीकडुन ४ लाख ५० हजार/- रु. एक ॲपल कंपनीचा लॅपटॉप व २५,०००/-रु.चे दोन मोबाईल फोन असा एकुण ४,७५,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार, निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक इसम कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करीत आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव येथे जावुन पाहता तेथे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे रोहीत शंकर साठे, वय २० वर्षे, रा. गुजरवाडी, खोपडेनगर, कात्रज, पुणे हा ॲपल कंपनीच्या महागड्या लॅपटॉपसह व दोन मोबाईल फोनसह मिळुन आल्याने त्याचेकडे तपास करता त्याचे ताब्यातील ॲपल कंपनीचा महागडा लॅपटॉप हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८२४/२०२३, भादंवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपीकडुन ४,५०,०००/- रु. एक ॲपल कंपनीचा लॅपटॉप व २५,०००/-रु.चे दोन मोबाईल फोन असा एकुण ४,७५,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजय पुराणिक, श्री. गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे, विठ्ठल चिपाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments