दि.०१/०१/२०२४ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दितील पानमळा वसाहत येथे पहाटे फिर्यादी यांचेवर तत्कालीन वादातुन त्याचे ओळखीचे चार इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यांचेवरूध्द खुनाचा प्रयत्न केलेबाबत पर्वती पोलीस स्टेशन, येथे गुरनं.००२/२०२४, भा.दं. वि. कलम ३०७,३२३,५०४, ५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका ३७ (१) सह १३५, क्रि. लॉ. अमें. कलम ७ प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी पर्वती पोलीसांना आरोपींना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयराम पायगुडे यांनी तपास पथकातील अंमलदारांची दोन पथके पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे यांचे करवी तयार करुन आरोपी पकडणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तवाडी भागात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार, पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, कुंदन शिंदे यांना त्यांचे खास बातमीदार यांचेमार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हे त्यांचे मित्रांना भेटण्यासाठी दत्तवाडी येथील म्हात्रे पुला खाली येवुन थांबले आहेत.
सदर बातमीचे अनुशंगाने पर्वती पोलीसांनी सापळा रचुन म्हात्रे पुलाखाली आरोपी नामे १) हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे, वय-२० वर्षे, रा. दत्तवाडी, पुणे २) तुषार भरत कदम, वय २३ वर्षे, रा. हनुमान नगर, दत्तवाडी, पुणे ३) आदित्य शंकर चव्हाण, वय १८ वर्षे, रा.९९९/१२९, जुना दत्तवाडी रोड, दत्तवाडी पुणे ४) पियुश श्रीकांत गायकवाड, वय २३ वर्षे, रा. हनुमान नगर, दत्तवाडी, पुणे यांना शिताफीने पकडुन त्याचेकडे विश्वासात घेवुन चौकशी करता, त्यांनी दाखल गुन्हा तत्कालीन वादातुन केल्याचे कबुली दिल्याने लागलीच त्यांना उपरोक्त गुन्हयात दि.०२/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उप. निरी. चंद्रकांत कामठे पर्वती पो स्टे हे करीत आहेत.
सदरील आरोपी पैकी आरोपी नामे हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे हा दत्तवाडी, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील सराईत आरोपी असुन, त्यांनी अजुन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत पर्वती पोलीसांकडुन सखोल चौकशी सुरु आहे.
सदरील कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि-३, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. अप्पासाहेब शेवाळे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. विजय खोमणे, पोलीस उप निरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, पुरुषोत्तम गुन्ला, दया तेलंगे पाटील, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, अमोल दबडे व अमित चिव्हे यांनी केली आहे.
0 Comments