कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.घरफोडीतील आरोपीस कोंढवा पोलिसांकडून अटक,सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेख गुन्हे दाखल आहे.



दिनांक ४/१/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन CR NO 12/2024 IPC 454,380 घरफोडी मधील अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याबाबत मा. वरिष्ठांनी आदेशित केले असता. सदर अज्ञात चोरट्याचा वेगवेगळे सी सी टी व्ही च्या आधारे शोध घेतला असता, पोलीस शि. शशांक खाडे, यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे फैईम फैजल शेख वय २१ वर्षे, राहणार लक्ष्मी नगर कोंढवा पुणे, हा पुण्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे. सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेख गुन्हे दाखल आहे.

सदर कामगिरी मा. रितेश कुमार पोलिस आयुक्त, मा.रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ ५, मा. शाहूराजे साळवे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मा.संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री दिनेश पाटील सहा पो निरी, पो हवा अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी,पो अम रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे,पो अम भोसले, पो अम पाटील,पो अम गरुड,पो अम मोरे, पो अम थोरात, शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments