यातील फिर्यादी ह्या त्यांचे कंपनीचे कार्यालया समोरून पायी जात असताना, स्कुटरवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र हात घालुन हिसका मारुन तोडून नेले. सदरबाबत अनोळखी इसमांविरुध्द खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची तात्काळ दखल घेवुन दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीतांचे दुचाकी गाडीचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे वडगांव-धायरी, सिहंगड रोड, पुणे पर्यंत आरोपीतांचा माग काढत, सदर आरोपी निष्पन्न करुन दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे १) राहुल मच्छिंद्र कांबळे, वय-२४ वर्षे, रा. पुणे २) योगेश ऊर्फ सॅम जगदिश सोनवणे, वय-२३ वर्षे, रा. पुणे यांना अटक करुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेले सोन्याचे मंगळसुत्र आरोपीकडुन हस्तगत करण्यात आले आहे. सदर इसमांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली अॅक्सेस मोपेड त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेली असुन, सदर गाडी ही कोथरुड पोलीस स्टेशनकडील चोरीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे....
आरोपी नामे १) राहुल मच्छिंद्र कांबळे २) योगेश ऊर्फ सॅम जगदिश सोनवणे हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. सदर आरोपीतांची पूर्व रेकॉर्डची पाहणी करता, त्यांचेवर खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन, त्यांनी त्याचे सह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन, त्याचे इतर साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी स्वतःची संघटीत टोळी तयार करुन, गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले असुन त्यांनी जबरी चोरी करणे, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, (अतिरिक्त कार्यभार) व मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ४, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शना खाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मानसिंग पाटील, पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, रमेश जाधव, पोलीस अमंलदार, किरण मिरकुटे, महिला पोलीस अंमलदार स्वाती म्हस्के यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९४ वी कारवाई आहे.
0 Comments