पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा पिस्तुल बाळगुन त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.
मा. पोलीस आयुक्त सो, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील व पोउपनि सचिन चव्हाण वाकड पोलीस स्टेशन हद्दीत जास्तीत जास्त पेट्रोलींग करुन तसेच राञीचे वेळी अचानक नाकाबंदी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासुन बेकायदा पिस्तुल बाळगणा-यांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले.
दि.०५/१२/२०२३ रोजी पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. राजेंद्र काळे, सपोफौ. बाबाजान इनामदार, पोहवा. बंदु गिरे ब.नं.२९२४ असे पोलीस स्टेशन मध्ये हजर असताना त्याचे पथकास बातमी मिळाली की, पुणे शहर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल सोबत बाळगत डांगे चौक येथे कामानिमीत्त येणार आहे. अशी बातमी मिळालेने पोउपनि सचिन चव्हाण यांनी तात्काळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. गणेश जवादवाड यांना घटनेची माहीती देवुन त्यांचे परवानगीने छापा कारवाई करणेकरीता सोबतचे स्टाफसह डांगे चौक येथे जावुन सापळा कारवाई करुन थांबले असता मिळाले बातमी प्रमाणे एक इसम ज्याचे खांदयावर काळे रंगाची सॅक असलेला तेथे आला त्याची हालचाल संशयीत वाटल्याने लागलीच पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्याने स्वतःचे नाव विशाल ऊर्फ रावण सिध्दु बनसोडे वय २५ वर्षे रा. लमाणवस्ती, पीडीसी बँकेचे मागे, खडकवासला ता. हवेली जि.पुणे सांगीतले त्याचे ताब्यातील सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये २ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुस (राऊंड) असे मिळुन आले.
सदरबाबत पोहवा. वंदु गिरे यांनी दिले फिर्यादी वरुन वाकड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ११६५/२०२३ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन आरोपीस अटक केली आहे. आरोपीची दिनांक ०८/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे. आरोपी वर यापुर्वी हवेली पो.स्टे जि. पुणे ग्रामीण गु.रजि.नं. ७३/२०२२ भादविक ३०७, १४३,१४७,१४८,१४९,३२३,४२७, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४,२५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे साो, सह.पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त साो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. काँतेय खराडे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, यांनी मिळुन केली आहे.
0 Comments