पर्वती टेकडी येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे रहस्य तब्बल साडेतीन वर्षानंतर उघड झाले आहे याप्रकरणी एका आरोपीला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे, या महिलेचा मृतदेह ऑगस्ट २०२० मध्ये बेवारस अवस्थेत सापडला होता तर वैद्यकीय अहवाल सात डिसेंबर २०२३ रोजी प्राप्त झाल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. सागर दादाहरी साठे, वय २६ राहणार सुतारदरा कोथरूड असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्ट २०२० तळजाई जंगलात गेलेल्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात येऊन कळविले की पर्वती टेकडीच्या वरील बाजूला जंगलामध्ये टाकीजवळ तळजाई टेकडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. अशी माहिती मिळतात त्या ठिकाणी तात्कालीन पोलीस पथक रवाना झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला,मृतदेहाचे
शवविच्छेदन केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेहऱ्यावर व छातीवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. परंतु महिलेची ओळख पटू शकली नाही.
दरम्यान वैद्यकीय अंतिम अहवाल आल्यावर दिनांक सात डिसेंबर २०२३ रोजी पर्वती पोलीस ठाण्यात रीतसर खूणाचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पर्वती पोलिसांची चार पथके तयार करून संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड बारकाईने तसेच प्रत्यक्ष जाऊन शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन येथे तपासण्यात आले. पोलिसांना माहिती मिळाली की या वर्णनाची महिला दिनांक १२ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही, म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित खेड शिवापुर पोलीस आऊट पोस्ट येथे मिसिंग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पद्धतीने तपास करून, सागर साठे या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करतात त्याने त्याच्या ओळखीच्या असलेल्या सुरेखा चव्हाण, वय ३६ राहणार वेताळनगर शिवापूर हिचा भांडणाच्या वादातून व पैशासाठी खून केल्याचे कबूल केले.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सूर्या जाधव यांनी केलेली आहे.
0 Comments