गुगल वरून शोध घेऊन उच्चभ्रू परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला येरवडा तपास पथकाने शिताफिने तपास करून तेलंगणा येथून अटक केली. याप्रकरणी नरेंद्र बाबू नूनसावद(वय 27, रा. आरटीसी कॉलनी, हैदराबाद तेलंगणा ) याला अटक करण्यात आली,
घरफोडी करणारे एक आरोपी अटक इतर दोन साथीदारांच्या मदतीने येरवडा व चतुर्शिंगी पोलीस स्टेशन हद्दीत केलेले घरफोडीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या सराईत आरोपीकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
कल्याणी नगर येथे 6 ऑक्टोबर रोजी खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञात चोरट्याने साडेसात लाख रुपये किमतीचे दागिने व अडीच लाख रुपये रोख रक्कम साथीदारांच्या मदतीने चोरी करून फरार झाले होते. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याणीनगर येथील गुन्हा चतुर्शिंगी पोलीस स्टेशन हद्दीतील भोसलेनगर येथे झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्याप्रमाणे एकाच आरोपींच्या टोळीने केल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी येरवडा व चतुर्शिंगी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आलेले होते.गुन्ह्यातील मुख्य आरोपी नरेंद्र हा तेलंगणा येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहितीवरून विशेष पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने सतीश बाबू करी व गुरुनायक केतावत (रा. हैदराबाद तेलंगणा ) यांच्या मदतीने केल्याचे कबूल केले. मोठ्या शहरांमध्ये इंटरनेटवरून उच्चभ्रू परिसराची माहिती घेऊन बंद असलेल्या घरांची रेकी करून घरफोडीचे गुन्हे करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. कल्याणीनगर एक व चतुर्शिंगी येथील दोन अशा एकूण तीन घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींनी सुमारे 60 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. यामधील येरवडा पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील दोन लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. घरपोडीच्या गंभीर गुन्ह्यातील या आरोपींवर यापूर्वी तेलंगणा, हैदराबाद, तिरुपती,चेन्नई परिसरात वीस ते पंचवीस घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत.
0 Comments