पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमाणसातील सर्व सामान्य नागरीकांना अवगत व्हावी. तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी तरंग-२०२३ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक २२/१२/२०२३ ते दिनांक २४/१२/२०२३ रोजी या कालावधीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी सकाळी ११ ते रात्री १० वा. पर्यंत आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम सोहळयाचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो / व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती देण्यात आली आहे.
त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वी कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल ११२, राज्य राखील दल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपुर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती प्रदर्शनात असणार आहे.
सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच बँड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन 'किड्स झोन' चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले आहे.
समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे आणि पोलीस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा) आणि मराठी सिनसृष्टीतील हास्य कलाकार इतर सेलीबेट्री यांचे विविध कार्यक्रमांचा समाविष्ट करण्यात आले होते.
या सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात असणार आहे. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित होते.
दिनांक २२/१२/२०२३ रोजी मा. उप. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस तसेच दिनांक २३/१२/२०२३ रोजी कार्यक्रमाचे दुस-या दिवशी मा. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी तरंग-२०२३ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयास भेट देऊन सर्व स्टॉल यांना भेटी दिल्या त्यावेळी पाईप बैंड तसेच जलद प्रतिसाद पथक (क्यु.आर.टी.) यांनी आपआपली प्रात्यक्षिके सादर केली. सदर वेळी मा. पोलिस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) श्री रामनाथ पोकळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच मा. माजी पोलिस महासंचालक श्री. अजीत पारसनीस, मा. माजी पोलिस महानिरीक्षक श्री. अविनाश पारधी, रेडिओ जॉकी आर.जे. संग्राम यांनी ही सदर कार्यक्रमास भेटी दिल्या आहेत.
0 Comments