कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.मौजमजेसाठी चोरीच्या मोटार सायकल विक्री करणाऱ्या (एजन्ट) आरोपीकडुन, कोंढवा पोलिसांनी १५ मोटार सायकल जप्त केले.



कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करून चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पो अं विकास मरगळे, राहुल थोरात, जयदेव मोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निखील सुनिल राक्षे, रा. प्रेमनगर मार्केट यार्ड पुणे हयाच्याकडे एक होंन्डा शाईन मोटार सायकल असुन त्याच्यावर नंबर प्लेट नाही सदर गाडी ही चोरीची असुन तो ती विक्री करण्यासाठी बोपदेव घाट या ठिकाणी जाणार आहे त्यावेळी बोपदेव घाट याठिकाणी वरील स्टाफच्या मदतीने सापळा रचुन ताब्यात घेवुन त्याचेकडे मिळुन आलेल्या मोटार सायकल बाबत तपास केला असता त्याने सदर मोटार सायकल हि त्यास महेश चव्हाण नावाच्या इसमाने चोरी करुन विक्री करीता दिली आहे. तसेब तो सदर चोरीची गाडी विक्रीसाठी तो ग्राहक शोधत असल्याची कबुली दिली. सदर आरोपी याने चोरीच्या  मोटार सायकल विक्री केल्याचा संशय असल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास पोलीसी खाक्या दाखवुन सखोल तपास केला असता त्याने महेश चव्हाण याने त्यास २ बुलेट, २ यमाहा, १ केटीएम, ३ युनिकॉर्न, २ अॅक्टिव्हा, १ शाईन अशा मोटार सायकल त्यास महेश चव्हाण याने चोरी करुन विक्री करीता दिल्याची माहिती दिली त्याने काही मो/ला हया इंदापुर भागातील शेतकरी लोकांना कागदपत्रे नंतर देतो असे सांगुण विक्री केल्याचे सागितले सदर गाडया विकत घेणाऱ्या व्यक्तीकडुन जप्त करण्यात आल्या


तसेच काही दुचाक्या ग्राहक मिळे पर्यंत रोडलगत ठिकठिकाणी सोडल्या होत्या त्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. एकुण ११ मोटार सायकल विक्री करण्यासाठी महेश चव्हाण याचेकडुन घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन ५,५०,०००/- रुपये किमतीच्या एकुण ११  वाहने जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीला विश्वासात घेवुन आणखीन तपास केला असता त्याने सागर शिवाजी गुजले रा- माण सातारा याचेकडे हि १ युनिकॉर्न, २ पल्सर  तसेच गणेश भरत मोहिते, रा.ता.माण, जि. सातारा पुणे वाचेकडे १ चोरीची स्प्लेन्डर मोटार सायकल असुन त्याचे विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या अनुषंगाने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन हि १,५०,०००/- रुपयांच्या ३ मोटर सायकल हया जप्त करण्यात आल्या आहेत. वरील तीनही आरोपीकडुन खालील प्रमाणे मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड झाले आहे.

कोंढवा पोलीस स्टेशन येथील ८ गुन्हे उघड .

वानवडी पो ठाणे. १ गुन्हा.


राजगड पोलीस ठाणे पुणे,१ गुन्हा.

माणगांव रायगड / माणगांव, १ गुन्हा.

महाळुंगे एम.आई. डी. सी. पोलीस ठाणे येथे, १ गुन्हा

वाठार सातारा पोलीस ठाणे पुणे ,१ गुन्हा.

सासवड पोलीस ठाणे ग्रामीण पुणे,१ गुन्हा.

सदर आरोपीत यांचेकडुन वरील गुन्हयामधील १४ वाहने जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेल्या यमाहा मो/सा बाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. सदर मोटार सायकल बाबत अधिक तपास करीत आहोत. वरिलप्रमाणे कामगिरी ही मा रितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा.रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त सो परि.५. मा. शाहुराव साळवे, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा, पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो हवा ६९४६ राहुल बजारी पो. शि.१०११४ सुहास मोरे, पो.शि.१००२६ राहुल थोरात, पो.शि.८६४६ जयदेव भोसले, पो. शि.९१२६ विकास मरगळे, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.शि.८७५१ शशांक खाडे, पो.शि. ८५०४ आशिष गरुड, पो.शि.५७८ रोहित पाटील, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments