सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर.२ गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त,दोन सराईत आरोपींना अटक.



सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे याचे आदेशाने हद्दीमधील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम, घरफोडी व वाहन चोरीच्या गुह्यांना आळा घालण्यासाठी खाजगी वाहनावरुन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहा. पो. फौजदार आबा उत्तेकर पोलीस अंमलदार राहुल ओलेकर व पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी मन्या चोरघे व त्याचे सोबत त्याचा मित्र वैभव तरडे यांचे कडे गावठी पिस्टल असुन ते दोघे नांदेडसिटी गेटच्या बाजुस सार्वजनिक रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे थांबले आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सोबतचे सपोनि सचिन निकम यांना कळविली,

सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी सापळा लावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे मन्या चोरघे व वैभव तरडे हे त्याठिकाणी थांबले असल्याचे दिसले. दोघेही त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना सोबतचे स्टाफच्या मदतीने काही अंतरावर दि.२०/११/२०२३ रोजी शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव पत्ता (१) मनोज ऊर्फ मन्या ऊर्फ शिवप्रसाद किसन चोरघे वय-२० वर्षे राहनार. धायरी पुणे (२) वैभव अनंता तरडे वय-२३ वर्षे राहनार. धायरी पुणे असे असल्याचे सांगितले त्यांना त्याचे जवळ ७५,०००/-रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल व १५००/-रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुसे असा एकुण ७६,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द सिंहगडरोड पो स्टे गु र नं. ५६६/२०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) मपोअधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये दाखल करण्यात आला असुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, श्री. सुहेल शर्मा मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा.पो.फौज. आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, राजु वेंगरे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली आहे,

Post a Comment

0 Comments