दिनांक ३/११/२०२३ रोजी तपास पथकातील सपोनि श्री राम गोमारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे बंगलोर मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महींद्रा पिकअप मधुन प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने श्री राम गोमारे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पौळ यांना नमुद बातमीची हकीकत सांगुन सपोनि गोमारे यांनी सहा. पो. फौ. मारणे, पो. हवा नरळे, पो.ना चव्हाण, पो.ना. गडदे, पोशि पालवे व पोशि शिंदे असे पोलीस स्टाफसह बंगलोर मुंबई हायवे येथे सापळा लावला असता बातमीतील वर्णनाप्रमाणेची पिकअप महिंद्रा गाडी न्यु सागर हॉटेल समोर, बंगलोर मुंबई हायवे, ताथवडे, पुणे येथुन जाताना दिसल्याने पोलीस स्टाफसह सदर गाडी अडवुन त्यामधील दोन इसमांना त्याचे नाव पत्ता व गाडीमध्ये काय माल आहे असे विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) वाकाराम ठाकरारामजी जाट, वय १९ वर्ष, रा. बालाजी ट्रेडींग कंपनी, जयभवानी हॉटेल जवळ, खालुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे मुळ गाव मु.पो. शेंडवा, ता. गोरामणी, जि. बाडनेर राजस्थान २) बोगाराम सुखराम बिष्णोई, वय १९, रा. सदर असे सांगुन गाडीतील मालाबाबत उडवाडवीची उत्तरे दिली त्यानंतर सदर गाडीची पाहणी केली त्यामध्ये विमल कंपनीचे गुटख्याचे बॉक्स व सुंगधी तंबाखुचे पाऊच मिळुन आले. सदर माल त्याने कोणाकडून आणला या बाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा माल हा पाहीजे आरोपी सुजीत खिंवसरा, रा. कोथरूड, पुणे याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगीतले महींद्रा पिकअप वाहन व प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थ असा एकुण १८,१८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करुन आरोपी क्रमांक १ व २ यांना हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १२४३ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३. १८८, ३४ या गुन्हयात दिनांक ०३/११/२०२३ रोजी २१/३० वा. अटक करण्यात आली असुन आरोपी क्रमांक ३) सुजीत खिंवसरा रा. कोथरुड याचा हिंजवडी पोलीस शोध घेत आहेत. मुखांचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होणारे शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य गुटखा व पानमसाला पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करीता नेत असलेला गुटखा पकडुन त्यातील आरोपींवर कारवाई करून हिंजवडी गुन्हे शोध पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर मा. डॉ. श्री. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड मा. श्री. विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीराम पौळ, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहा पो. फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, पोलीस अंमलदार रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.
0 Comments