दि. ०६/१०/२०२३ रोजी रा. पत्ता अयोध्या नगरी, को ऑ. ही सोसायटी, भाऊ पाटील, बोपोडी पुणे,हे फिर्यादी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत असताना आरोपी नामे, १) मुकेश ग्यानसिंग भुरीया, वय २७ वर्षे, रा.मध्यप्रदेश राज्य, २) सुनिल कमलसिंग आलावा, वय २८ वर्षे, रा. ग्राम २२ वर्षे, रा.धारा, मध्यप्रदेश राज्य, ३) हरसिंग वालसिंग ओसनिया, वय २२ वर्षे, रा. मध्यप्रदेश राज्य, ४) सुंदरसिंग मयानसिंग मुरीया, वय २५ वर्षे, रा. मध्यप्रदेश राज यांनी संगनमत करुन फिर्यादी यास चक्काबुक्की करुन जबरदस्तीने फिर्यादी याची रोख रक्कम रु २१००/- रु चोरी करुन घेवुन गेले. सदरबाबत खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.३७४/२०२३ ना.द. वि. कलम. ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीताना यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी यांचेकडुन गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर यानी तपास करुन त्यांचेकडुन पुणे शहर आयुक्तालयातील एकुण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे, १) मुकेश ग्यानसिंग भुरीया,२) सुनिल कमलसिंग आलावा, ३) हरसिंग वालसिंग ओसनिया, ४) सुदरसिंग भयानसिंग भुरीया, हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांवेविरुध्द यापुर्वी, चोरी करणे, घरफोडी करणे व जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी सुंदरसिंग मयानसिंग मुरीया, वय २५ वर्षे, मध्यप्रदेश यांने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन त्यानी बेकायदेशीर मार्गाने स्वतासाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिसाबार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य वालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील जुमानत नसलेने तसेच त्याचे वर्तनात सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२) ३(४) चा अंतर्भाव करणेकामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यानी
मा.शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परि ४, पुणे शहर यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन शर्मा याना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरिल टोळीविरूद खड़की पोलीस स्टेशन येथे गु.न. ३७४/२०२३ भा.द. वि. कलम. ३९२, ३४, अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री, रंजन शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस राह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन शर्मा, मा. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र सहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. वैभव मगदुम, पोलीस उप निरीक्षक, श्री. सतोष माडवलकर, पोलीस उप निरीक्षक सर्वेलन्स अंमलदार रमेश जाधव, म. पोलीस अमंलदार किरण मिरकुटे, म. पोलीस अंमलदार स्वाती म्हस्के यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यानी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार याचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार याना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही कारवाई आहे.
0 Comments