दि. १४/११/२०२३ रोजी मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील श्री. उमेश गायकवाड, यांचे निवासस्थानी मुंढवा गाव येथे मा. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य यांनी दिपावली सनानिमित्त भेट दिली. सदर कार्यक्रमाचे ठिकाणी कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य बंदोबस्त लावण्यात आला होता. मा. महोदय कार्यक्रम ठिकाणी येत असताना, मुंढवा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांचे कडून सायकल पेट्रोलींग करण्यात येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
मुंढवा पोलीस ठाणेकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपुर्ण सायकल पेट्रोलींग हा उपक्रम पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे, मुंढवा यांचेकडून सायकल पेट्रोलींगमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती घेतली. तेव्हा अरुंद रस्ते, गल्लीबोळाचे रस्ते, रहदारी परिसरात चारचाकी पोलीस वाहनांतून गस्त घालताना मर्यादा येतात, या पार्श्वभूमीवर सायकल वरून गस्त घालणे सोपे होत आहे. तसेच या उपक्रमातुन व्हिजिबल पेट्रोलींग होवून गुन्ह्यांना प्रतिबंध व नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षितता साठी मदत होत आहे. सायकल पेट्रोलींगमुळे पोलीस अधिकारी अंमलदार यांची शारिरीक तंदुरूस्ती देखील चांगली राहणेस मदत होते. सदर उपक्रमाची माहिती घेवून पुणे शहर पोलीस दलाचे
व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे व इतर अधिकारी तसेच सयकल पेट्रालिंग करीता उपस्थित पीएसआय अनिल बिनवडे, सपोफो रमेश उगले, पो.हवा. वैभव मोरे, पो.ना. गोकुळ सोडणवर, पो.शि. दयानंद गायकवाड व म.पो.शि. स्वाती परभणे यांचे कौतूक केले.
सदर वेळी, मा. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री, श्री. दिलीप कांबळे, आमदार मा. श्री. सुनिल कांबळे, माजी आमदार श्री. जगदीश मुळीक, श्री. - बापुसाहेब पठारे, श्री. प्रमोदनाना भानगिरे (शिवसेना), तसेच इतर मान्यवर हजर होते.
0 Comments