कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपी कडून चोरीचे ५ वाहने जप्त, आरोपीला कोंढवा खडीमशीन चौक येथून अटक.




कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन चेकिंग करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, शशांक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील, राहुल रासगे असे गुप्त बातमीदारा मार्फतीने, रहदारीच्या ठिकाणी अचानक वाहन चेकिंग करुन तसेच वयाने कमी असणारे जी मुले गाडी चालवत आहे, त्यांना तपासुन वाहने चेक करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना दि. ०७/११/२०२३ रोजी आशिर्वाद चौकात आलो असताना
 पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक ग्रे रंगाचे जर्किंग घातलेला इसम हा खड़ी मशीन चौकातील चहाच्या टपरीच्या शेजारी थांबलेला असुन त्याच्याकडे असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोटार सायकल वर नंबर प्लेट नसुन सदर मोटार सायकल विकण्यासाठी तो ग्राहक शोधत असुन गाडीची कागदपत्र नंतर देतो असे सांगत आहे. त्याच्याकडे असणारी मोटार सायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. तेव्हा वरिल स्टाफच्यासह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री केली असता खड़ी मशीन चौकातील चहाच्या टपरीच्या शेजारी एक इसम बसलेला दिसुन आला. त्यास पकडण्याकरिता गेलो असता त्याला चाहुल लागली असता तो वॉल कंपाऊंन्ड वरुन उडी मारुन पळुन जावु लागला. तेव्हा त्यास वरिल स्टाफच्या मदतीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता अमन अलीम शेख, वय २५ वर्षे, राहणार कोंढवा पुणे, असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे असणाऱ्या अँटिव्हा मोटार सायकल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागला. तेव्हा त्यास पोलीस ठाणेस आणुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदर इसमाकडे मिळुन आलेली गाडी ही कोंढवा पोलीस ठाणे येथे, दाखल असणाऱ्या गुन्हयातील चोरी गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा रेकार्डवरिल वाहन चोरी करणारा आरोपी असल्याने त्याच्याकडे सखोल तपास करुन त्याच्याकडुन, १,५०,०००/-रु किमंतीच्या एकुण ५ चोरीच्या मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न करुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.

कोंढवा पोलीस स्टेशन येथील ३ गुन्हे,

लष्कर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे,


वरिलप्रमाणे कामगिरी ही मा. रितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा.संदिप कर्णिक साो, सह पोलीस आयुक्त, मा. रंजन शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त सो परि०५ मा. शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे)व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments