सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर.मौजमजे साठी १४ महागड्या सायकली चोरी करणाऱ्या सुशिक्षीत दांम्पत्यास अटक करून, ३ लाख, ५० हजार/-रुपये किमती चा मुद्देमाल केला जप्त.



दिनांक ०६/०८/२०२३ रोजी मंदार अपा फ्लॅट नं.०८ आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथील पार्किंगमधुन स्नेल फिफ्टर कंपनीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरी करुन घेवुन गेलेबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे, गुप्त बातमीदारांकडे माहिती काढुन, अज्ञात आरोपीचा सखोल तपास करीत असताना दि. २६/१०/२०२३ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे यांचे आदेशान्वये तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम व तपास पथकातील स्टाफ वाहनावर पेट्रोलिंग करीत वडगाव ब्रिज जवळ आले असता पोलीस अंमलदार, सागर शेडगे व राहुल ओलेकर यांना एका काळ्या दुचाकी मोपेड गाडीवरुन एक इसम व त्याचे पाठीमागे महीला असे दोघे गाडीवरुन सायकल घेवुन जात असताना संशयीतरित्या दिसल्याने, त्यांना सोबतच्या स्टाफच्या मदतीने थांबवुन गाडी चालविणारा इसम १. विजय राजेंद्र पाठक, वय-३६ वर्षे. रा, तळेगाव, पुणे, मुळ पत्ता-राक्रिश अपार्टमेट फ्लॅट नं. २०१, नवरेनगर, डिवॉन रोड अंबरनाथ, (इस्ट), ठाणे व त्याच्या पाठीमागे बसलेली महिला वय २५ वर्षे रा, तळेगाव, पुणे यांना ताब्यात घेवुन, त्यांच्याकडे घेवुन जात असलेल्या सायकल बाबत चौकशी करता ते काहीएक समाधान कारक उत्तर न देता उडवा उडवीचे उत्तरे देवुन लागल्याने, त्यांच्या ताब्यात असलेल्या सायकल बाबत अधिक तपास करता सदर इसमाने त्याचेसोबत असलेली महीला डायना डिसोजा हीचे मदतीने मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकली चोरी करीत असल्याचे सांगितले.

नमुद आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्ह्याचे तपास कामी दि. २६ / १० / २०२३ रोजी अटक केली असुन, त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे अधिक तपास करता, सुशिक्षीत दांम्पत्याने मौजमजा करण्यासाठी नामांकित कंपनीच्या महागड्या सायकली चोरी केल्याचे सांगुन ३,५०,०००/- रुपये किमंतीच्या एकुण १४ सायकली हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपी यांच्याकडुन एकुण सायकल चोरीचे ३ गुन्ह्याची उकल करण्यात आली असून उर्वरीत मिळुन आलेल्या सायकलीचा तपास सुरु असुन पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ - ३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांचे पथकाने केली.

Post a Comment

0 Comments