दिनांक ३०/१०/२०२३ रोजी श्रीकृष्ण हाईटस घोरपडी पेठ पुणे येथे इसम नामे अनिल रामदेव साहु वय ३५ वर्ष रा. सदर यास दोन अनोळखी इसमांनी बंदुकीतून गोळया घालून जीवे ठार मारले होते. सदर बाबत अनिल साहु याचा भाऊ धुरणकुमार साहु याने दिलेल्या तक्रारी वरून खडक पोलिस स्टेशन गुर नं. ३६९ / २०२३ भादवि कलम ३०२, ३४ आर्म अॅक्ट ३/२५, महा पो अॅक्ट ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा घडताच आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. दाखल गुन्हयांची माहिती मिळताच युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी भेट देवुन सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली नमुद आरोपींचा शोध घेऊन वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसापुर्वी मयत इसम अनिल साहु यास ५०००/- रु मागितले होते परंतु त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन, रात्री २ वा सुमारास मयत इसम अनिल साहु, यास बंदुकीतून गोळया घालून जीवे ठार मारले होते,खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना
युनिट- १ गुन्हे शाखा,यांनी अटक केले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री अमोल झेंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील - • वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अजय थोरात, अनिकेत बाबर, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे व शशीकांत दरेकर यांनी केली आहे.
0 Comments