कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.कोंढवा पोलीसांची व्हिसा मुदत सपंलेल्या परदेशी नागरिकांवर कारवाई.युगांडा देशाच्या ४ परदेशी महिला त्याच्या व्हिसा मुदत सपलेल्या असताना सुध्दा, दीड वर्षापासून लपून राहत होते.



पुणे शहरामध्ये मा रितेशकुमार, पोलीस आयुक्त सो मा संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त सो व मा. ए राजा, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा यांनी अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकावर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्वे प्रादेशिक विभाग, मा विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त परि.५ मा शाहुराव साळवे, सहा पोलीस आयुक्त सो वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय मोगले, पोलीस निरीक्षक, गुन्हे व संदिप भोसले पोलीस निरीक्षक, गुन्हे यांच्या सुचनाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत दहशतवादी विरोधा पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उप निरीक्षक वैभव सोनवणे, सहा पोलीस निरीक्षक योगिता कुदळे, पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस अंमलदार सुभाष जरांडे, महिला पोलीस अंमलदार संगिता घेरडीकर, परशुराम पिसे, नारायण गिरी असे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत परदेशातील भाडयाने राहणाऱ्या नागरिकांना तपासून चेक करत असताना, तसेच बातमीदाराच्या माध्यमातुन माहिती काढून कोणी परदेशी नागरिक व्हिसा मुदत संपलेली असताना सुध्दा चोरुन कोंढवा भागात राहत आहेत का? याबाबत माहिती घेत. तेव्हा दि. ११/१०/२०२३ रोजी कन्हैया सोसायटी महंमदवाडी याठिकाणी युगांडा देशाच्या ४ परदेशी महिला त्याच्या व्हिसा मुदत सपलेल्या असताना सुध्दा लपुन राहत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. तेव्हा सदर बाबत वरिष्ठांना कळविले असता वरिष्ठाची कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. तेव्हा कन्हैया सोसायटी महंमदवाडी येथे वरिल स्टाफच्या सह जावुन तेथुन परदेशी 1. Nalubega sarah passport-81381344, 2. Nakato Lydia passport A00124676, 3. Nabunya Fatuma passport-A00674299, 4. Nambooza Aisha passport-81608432 यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडील व्हिसा व पोसपोर्ट कागदपत्राची पडताळणी करता २ महिला भारत देशात वैदयकिय उपचार व २ महिला हया पर्यटनासाठी आल्याची व त्याच्या व्हिसाची मुदत संपवुन दीड वर्षे झालेले असताना ही त्या ओव्हर स्टे करुन लपवुन राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर महिलांना परकिय नागरिक शाखा (विशेष शाखा-२) कडील पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांचे समक्ष हजर करून पुढील कायदेशीर कारवाई होई पर्यत मुंढवा महिला सुधारगृह येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments