यूनिट - ५, गुन्हे शाखा, पुणे शहर.दोन वाहनचोरांना अटक करुन त्यांचेकडुन,५ लाख २० हजार च्या एकुण १२ मोटर सायकली व १ रिक्षा जप्त .



दिनांक ०५/१०/२०२३ रोजी युनिट कडील स्टाफ हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना दोन इसम हे नंबरप्लेट नसलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल चालवित असताना गारवा हॉटेल, फुरसुंगी येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे १) सचिन महादेव कांबळे वय २१ वर्षे रा. जगदंबा गॅस एजन्सी, वडकी नाला, ता. हवेली जि.पुणे मुळगाव जवळगाबेट पो. माडज ता. उमरगा जि. धाराशिव व पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव २) गणेश दत्ता मोरे वय १९ वर्षे रा. सदर व मुळ मु.पो. गंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव असे असल्याचे सांगीतले. त्यांना युनिट कार्यालयात आणुन त्याचेकडे कौशल्यपूर्व तपास करुन त्यांचेकडुन कि.रु. ५.२०,०००/- च्या एकुण १२ मोटर सायकली व १ रिक्षा जप्त करणेत आलेली आहे. आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१. हडपसर पोलीस स्टेशन, ४ गुन्हे

२. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, २ गुन्हे

३. चंदननगर पोलीस स्टेशन, २ गुन्हे

४. भारती विद्यापिठ पोलीस स्टेशन, १

५. बंडगार्डन पोलीस स्टेशन, १

६. दिघी पोलीस स्टेशन, १

७. जेजुरी पोलीस स्टेशन, १

८. कल्याण तालुका पो.स्टे.  १

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस उप निरीक्षक चैताली गपाट, पोलीस अमलदार अकबर शेख, विनोद शिवले, रमेश साबळे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, आश्रुबा मोराळे, दाऊद सय्यद, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे, शहाजी काळे, चेतन चव्हाण, विलास खंदारे, राहुल होळकर, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments