जेवणाची ऑनलाईन ऑर्डर घेवून दिनांक १२/०९/२०२३ रोजी पहाटे मॅजेस्टीक नेस्ट सोसायटी समोरील मोकळया जागेसमोर, फुरसुंगी गाव, पुणे याठिकाणी गेले असताना, जेवणाची ऑनलाईन ऑर्डर मागवणारे तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना ऑर्डर का उशीरा आली. तुला पैसे देणार नाही असे बोलून मागविलेले जेवनाची ऑर्डर घेवून ऑर्डरचे पैसे न देता, फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम ५,२००/- रुपये तसेच एक मोबाईल हॅण्डसेट जबरदस्ती काढून घेवून, मोबाईलवरुन जबरदस्ती एकुण २,८८०/- रुपये ऑनलाईन कोणाचेतरी युपीआयवर ट्रान्सफर करुन घेवून तेथून हाकलून दिले. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १४२४/२०२३, भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पथकातील अधिकारी सपोनि. विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, प्रशांत दुधाळ, अमोल दणके, शाहीद शेख, चंद्रकांत रेजीतवाड असे आरोपींबाबत फुरसुंगी भागात माहीती घेत असाताना,तपास पथकातील पोलीस अंमलदार, प्रशांत दुधाळ व अमोल दणके यांना गोपनीय माहीती मिळाली की, फुरसुंगी गावाचे ओढ्यालगत गुन्ह्यातील आरोपी थांबलेले आहेत..
त्या अनुशंगाने सदर ठिकाणी जावून तपास पथकाने सापळा रचुन आरोपी नामे १) अरूण दिगंबर राऊत, वय २० वर्ष, रा. पवार आळी फुरसुंगी, पुणे २) कुणाल कैलास गायकवाड, वय २० वर्ष, रा. सदर ( अटक) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडुन फिर्यादी यांचा मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १०,२००/- रू किचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक, सुशील डमरे, हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संदीप शिवले यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांचे पथकाने केली आहे.
0 Comments