१८ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२३ चा उद्घाटन समारंभ



 दि. ०५/०९/२०२३ रोजी १६.३० वाजता राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. २, पुणे येथील परेड मैदानावर प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी महासंचालक, सी.एस. आय. आर. नवी दिल्ली यांचे शुभहस्ते संपन्न झाला. श्री प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., पुणे यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. स्पर्धेत सहभागी २४ संघांनी शिस्तबद्ध संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली त्यापुर्वी राज्य राखीव पोलीस बलाचे, पाईप बैंड ने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून व श्रवणीय वाद्य वाजवून प्रमुख पाहूणे व उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.

श्री प्रशांत बुरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गतवर्षीच्या ६६ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये पदक विजेत्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना व उपस्थितांना Technology, Trust Talent या त्रिसुत्रीचा आपल्या अंगी व्यावसायिक कुशलता, वृद्धींगत होण्यासाठी उपयोग करण्याचे आवाहान केले. तसेच स्पर्धकांना निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्याविषयी मार्गदर्शन करून आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरिता शुभेच्छा दिल्या व औपचारिकरित्या स्पर्धेचे उद्घाटन केले. ६६ व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या श्री श्रीकृष्ण गोविंद गवस, पोलीस उप निरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल यांना उद्घाटन ज्योत आणण्याचा मान देण्यात आला व त्यांनी स्पर्धकांना शपथ दिली.

सदर कार्यक्रमास श्री प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि. म.रा. पुणे, श्री सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.गु. अ. के. गु. अ. वि. पुणे, श्री संजय येनपुरे, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे पुर्व, गु.अ. वि. पुणे श्री अशोक मोराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, एस. आर.पी.एफ., पुणे, श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, पुणे शहर, श्री नामदेव चव्हाण, पोलीस उप महानिरीक्षक, आ. गु.शा., गु. अ. वि., पुणे, श्री सारंग आवाड, पोलीस उप महानिरीक्षक, प्रशासन,


गु.अ.वि., पुणे, श्री. पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, आ.गु.शा., गु.अ.वि., पुणे, श्रीमती नम्रता पाटील, समादेशक, एस. आर.पी.एफ., गट क्र. २ पुणे, श्री दिनेश बारी, पोलीस अधिक्षक, पुणे पथक, गु.अ.वि., पुणे, श्रीमती मनिषा दुबुले, पोलीस अधिक्षक, गु. अ. वि., कोल्हापुर, श्रीमती पल्लवी बर्ग, पोलीस अधिक्षक, का.व सं. गु.अ.वि., पुणे आणि श्रीमती पौर्णिमा तावरे, अपर पोलीस अधिक्षक, एम. आय. ए. पुणे तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य राखीव पोलीस दल व एम. आय. ओ. येथील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्याच प्रमाणे सदर उद्घाटन समारंभास श्री रामराव वाघ, सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक व पोलीस कुटुंबीय तसेच प्रिन्ट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी हजर होते.

१८ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२३ मधील स्पर्धाचे आयोजन दिनांक ०४/०९/२०२३ ते ०९/०९/२०२३ या कालावधीत राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १ व गट क्र. २ तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.गु.अ.के., गु.अ.वि. यांनी केले तसेच सुत्रसंचलन श्रीमती सुप्रिया पंधरकर, पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे शहर व श्री सचिन देवडे, पोलीस नाईक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ यांनी केले.

Post a Comment

0 Comments