लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर,लोणीकंद पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणाऱ्या इसमास अटक.



वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन,श्री. विश्वजीत काइंगडे यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि गजानन जाधव व स्टाप यांना गणेश उत्सवानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडु नये व पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणात साजरा होणारा गणेश उत्सव हा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने वरील अधिकारी व अंमलदार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्वप्नील जाधव व दत्ता गावडे यांना बातमी मिळाली की मांजरी खुर्द स्मशानभुमी समोर एक इसम उभा असुन त्याचेजवळ देशी बनावटीचे पिस्टल आहे.

त्याअनुशंगाने पोलीस अंमलदार गावडे यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली असता सपोनि गजानन जाधव यांनी सदरची बातमी श्री. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेशित केले.

मिळालेल्या बातमीची खातरजमा करुन संशयित इसमास ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांने त्यांचे नाव प्रथमेश अशोक धोंडे वय २१ वर्षे रा. माळवाडी हडपसर पुणे असे सांगुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशनला गुनं ७८६ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास बाळासाहेब सकाटे, सहाय्यक पोलीस फौजदार, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार . शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर श्री. शशीकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर श्री. संजय पाटील, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सिमा ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव, रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, दत्ता गावडे, सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments