दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - २ गुन्हे शाखा, पुणे शहर.मोज मजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या शातीर चोरास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक- २ गुन्हे शाखा यांनी घेतले ताब्यात.आरोपी कडून, ८ दुचाकी वाहने, १ लाख ८५ हजार किमतीची वाहने, हस्तगत.



मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरी, जबरी चोरी, दरोडा सारख्या गुन्ह्यांना आळा घालुन घडत असलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले आहे.

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३७४ / २०२३. भा. द. वि. कलम ३७९ मधील चोरी गेलेली ३५,०००/- रु. किंमतीचा होंडा अॅक्टीवा गाडी नं.एम.एच.३०/ए.एम./१२३२ व अज्ञात आरोपीचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -०२ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, संदीप येळे, राहुल इंगळे यांनी तांत्रिक विश्लेषणाचे सहाय्याने मुज्जफर ऊर्फ सलमान रफीक पठाण, वय-२६ वर्षे, रा. घुलेनगर, साई कृपा बिल्डींग, मांजरी-खुर्द, हडपसर, पुणे यास हडपसर भागातून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याचेकडुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा अॅक्टीवा गाडी नं. एम. एच. ३० / ए.एम./ १२३२ ही जप्त करण्यात आलेली आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे तो सदर गाड्या कशापध्दतीने चोरी करतो याबाबत चौकशी करता, तो वाहन चोरी करणेकरीता येताना ८ ते १० वेगवेगळ्या रंगाचे शर्ट एकावर एक घालुन येवुन, बनावट चावीचे सहाय्याने वाहन चोरी करतो. वाहन चोरी केल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर एक एक करुन शर्ट काढून फेकुन देत असल्याचे त्याने सांगितले आहे.

वर नमुद ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे आणखीन कसोशिने तपास केला असता, त्याचेकडुन एकुण ८ दुचाकी गाड्या किंमत रुपये १,८५,०००/- ची हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. नमुद आरोपी मुज्जफर ऊर्फ सलमान रफीक पठाण याने पुणे शहर व परिसरामधुन एकुण ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे - २, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार गायकवाड व पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments