मुंढवा परिसरात, एमडी कोकेन चरस विक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक, ४६,५९,०००/- किचे एम. डी. कोकेन, चरस या अंमली पदार्थ जप्त.

अंमली पदार्थ विरोधी पथक ०१. गुन्हे शाखा पुणे शहर

दि. १४/०८/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-०१ गुन्हे शाखेकडील पथक मुंढवा कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुंढवा पो स्टे हद्दीत होंडा सर्व्हिस शोरुम लोणकर वस्ती या ठिकाणी एक इसम व महिला हे दोघेजण त्यांचे ओळखीचे लोकांना एम. डी. कोकेन असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत आहेत.

नमुद मिळालेले ख़बरीचे अनुषंगाने सदरची खबर पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पो. निरीक्षक लक्ष्मण ढंगले यांना कळविली असता त्याबाबत त्यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा कारवाई करुन १ ) सागर कैलास भोसले, वय २६ वर्षे, रा. फ्लॅट न.०६ शितोळे बिल्डींग गल्ली नं.६. शंकरनगर, खराडी, पुणे व एका महिलेस जेरबंद करून त्यांचे ताब्यातुन एकुण ४४,११,०००/- किचा ऐवज त्यामध्ये २०८ ग्रॅम ९५० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) व ०५ ग्रॅम ५५० मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ व इतर ऐवज नमुद इसम व महिलेचे ताब्यात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगताना मिळुन आले. म्हणुन त्यांचेविरुध्द मुंढवा पो स्टे गुरनं. २७६ २०२३. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २१(ब). २२ (क) २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपींची दिनांक १८/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात पाहिजे आरोपी अजितसिंग भगवानीया यांनी अमली पदार्थ दिला असल्याचे सांगितले असल्याने त्यांचा शोध घेतला असता तो व त्याचा साथीदार नामे १) अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया, वय ४० वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०४, गुडविल ऑरचीड, धानोरी, पुणे २) इम्ररीन गॅरी ग्रीन वय ३७ वर्षे, रा. बंगला नं. २१/ए लेन नं.०६ खेसे पार्क लोहगाव रोड, पुणे हे मिळुन आल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडुन एकुण २,४८,०००/- रु किचा ऐवज त्या मध्ये ०४ ग्रॅम कोकेन व ७१ ग्रॅम चरस हे अंमली पदार्थ मोबाईल फोन असा ऐवज व अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपींना मुंढवा पो स्टे गुरनं. २७६/२०२३ चे गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. निरीक्षक लक्ष्मण ढंगळ हे करीत आहेत..

वरील नमुद कारवाई ही मा. पोलिस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, मा. सहा. पो. आयुक्त, गुन्हे १. श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पो. निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी, ज्ञानेश्वर घोरपडे, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे विशाल शिंदे, रेहाना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments