दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर.कर्नाटक येथून बनावट पनीर आणून ते पुणे शहरात, विक्री करण्यासाठी आलेला टेम्पो दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांच्याकडून शितापीने ताब्यात. एकूण ४९७० किलो पनीर जप्त.


दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांना खबर मिळाली की, कर्नाटक येथुन बनावट पनीर टेम्पो मधुन पुणे येथे आणले जाते व ते पुणे शहरातील अनेक छोटया-मोठया दुकानात हॉटेल मध्ये दिले जाते.

दिनांक ०५/०७/२०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा टेम्पो हा मा. वरिष्ठांचे परवानगीने कात्रज चौक पुणे शहर येथे अन्न व औषध प्रशासन कडील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती क्रांती बारवकर व पथक तसेच पंचांसह सापळा रचुन टाटा कंपनीचा टेम्पो हा ताब्यात घेतला व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती क्रांती बारवकर यांनी पंचांसह नमुद टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये बॉक्समध्ये एकुण ४,९७० किलो लुज पनीर साठा मिळुन आला. सदरचा माल हा अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचनामा करुन जप्त केला असुन त्या माला पैकी तपासणी करीता सॅम्पल घेण्यात आले आहेत. सदरचे सॅम्पल हे नॅशनल अॅग्रीकल्चरल अॅन्ड फुड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इंन्स्टीटयुट (Nafari) बाणेर, पुणे येथील लॅबला पाठविले.

सदर जप्त पनीर मधील काही पॅकेट मधील पनीर हे भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन त्या भेसळयुक्त व मानवी शरीरास घातक असलेल्या १० लाख रुपये किंमतीचा ४,९७० किलो लुज पनीर नाश करण्यात येत असुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असलेबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, मोशी, पुणे यांनी गुन्हे शाखा, पुणे शहर कळविले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - १, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे..

Post a Comment

0 Comments