पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथील दाखल विविध गुन्हयातील व प्रवाशांचे गहाळ झालेले एकुण ४५ मोबाईल पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीसांनी अथक परिश्रम घेवून हस्तगत करण्यात यश मिळवले असून, सदर हस्तगत केलेले एकुण ४५ मोबाईल, मोबाईल धारकांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परत करण्याची कामगिरी पुणे लोहमार्ग पोलीस दलाकडुन करण्यात आली.
तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ३३ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर, तसेच १३ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक ते पोलीस हवालदार अशी एकुण ४६ पोलीस अंमलदारांना शासन नियमानुसार पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.
तसेच पुणे लोहमार्ग पोलीस घटकाकडुन शालेय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शस्त्रांच्या प्रर्दशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन तज्ञ व्यक्तीव्दारे शस्त्रांच्या विविध भागांची व कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यात ५.५६ इन्सास रायफल, ९mm कार्बाईन मशिन, AK-४७, ग्लॉक पिस्टल, MP-५, ७.६२mm SLR, १२ बोअर, गॅसगन सारख्या आधुनिक शस्त्रांचा समावेश करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे, श्री. श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी फत्तेशिकस्त, पावणखिंड अशा एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपटात काम केलेले व नव्यानें येणाऱ्या सुभेदार या चित्रपटातील सुभेदार ही भुमिका साकारणारे अभिनेते श्री. अजय पुरकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या सर्वाकरीता फळ वाटप करण्यात आले.
जीआरपी पुणे पोलीसांतर्फे SOFOSH Society of friends of the Sasoon Hospital Pune या संस्थेत जावून तेथील लहान मुलांबरोबर ध्वजारोहण करण्यात आले व मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.
चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधीत मोबाईल धारकांनी रेल्वे पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. प्रर्दशनास भेट देण्यास आलेल्या विदयार्थी व शिक्षकवर्गाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस उप अधीक्षक श्री. चंद्रकांत भोसले, उप विभागीय अधिकारी पुणे, श्री. देवीकर व इतर अधिकारी वर्ग व पोलीस अंमलदारांचे आभार मानले.
0 Comments