समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर.तडीपारीत घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलीस स्टेशनने ठोकल्या बेडया.



समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व तपास पथकातील पोलीस अमलदार समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोना. रहीम शेख व पोअं. हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक संशयीत इसम हा मनुशहा मस्जिद जवळ, रास्ता पेठ, पुणे येथे थांबलेला असून त्याचेजवळ मोठी भरलेली गोणी असुन त्यामध्ये काहीतरी वस्तु आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिल पोलीस स्टाफ मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक . यांचे मार्गदर्शनाप्रमाणे मनुशहा मस्जिद जवळ, रास्ता पेठ, पुणे येथे गेलो असता सदरचा संशयीत इसम दिसून आला. पोलीसांना पाहुन तो इसम त्याचेजवळ असणारी गोणी जागेवरच टाकुन पळुन जावू लागला असता, त्याचा पाठलाग करुन त्यास स्टाफच्या मदतीने पकडले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता असता, त्याने त्याचे नाव व पत्ता सुमित फ्रैंकी हॉल, वय ३०, रा १७१, सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे असे सांगितले. तसेच त्याचेजवळ असलेल्या गोणीबद्दल विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यास सोबतचे पोलीस स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे असलेल्या गोणीमधील साहित्याबाबत विचारणा केली असता सदरचे साहित्य हे त्याने रेडचिल्ली हॉटेलच्या शेजारी असणारे बंद भंगारच्या गोडाऊनमधुन चोरले असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र. १९१/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७,३८० मधील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हाच असल्याची खात्री झाली. सदर आरोपीचा पोलीस रेकॉर्ड पडताळला असता, सुमित फ्रँकीहॉल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध भा.द.वि. कलमांअंतर्गत एकूण १४ गुन्हे असल्याचे समजले. तसेच त्याला मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ पुणे शहर यांच्या कडुन हद्दपार आदेश क्रमांक २१/२०२३ नूसार पोलीस आयुक्तालय पुणे शहर व संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्री संदीप गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - १ पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, पोना. रहीम शेख, पोअं. हेमंत पेरणे, सपोफी. दत्तात्रय भोसले, पोहवा. रोहीदास वाघेरे, पोना सोमनाथ धगे, पोहवा, जितेंद्र पवार, प्रमोद जगताप, पोहवा. गणेश वायकर, पोअं. अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शरद घोरपडे.

Post a Comment

0 Comments