पिंपरी चिंचवड परीसरात होणा-या जबरी चोऱ्यामध्ये मोठया प्रमाणावर वाद झालेने मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना वाहन चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याचे तयारीत असलेले इसम चैन स्नॅचिंग इत्यादी सर्व प्रकारच्या गुन्हयांना प्रतिबंध होण्याकरीता सतर्क पेट्रोलिंग व विवीध उपाययोजना करुन गुन्ह्यांना प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत आदेशित केले आहे.
त्या अनुषंगाने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे घडणारी वेळ व रस्त्यावरील संशयित वाहने चेक करणे, संशयितांना ताब्यात घेवुन चौकशी करणे, तसेच सतर्कतेने पेट्रोलींग करुन गुन्हयांना आळा घालणे व आरोपींना पकडुन गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिनांक १७/०८/२०२३ रोजी तपास पथकातील अंमलदार सपोफी, राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोना अतिक शेख व पोशि रमेश खेडकर हे वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे सतर्क पेट्रोलिंग करीत असताना, वाकड पोलीस ठाणे हद्दीत रात्री ०३.०० वा. चे सुमारास गोपनीय खबऱ्याकडुन डी मार्ट, थेरगावचे बाजुस असलेल्या जगताप कॉलनीमध्ये जाणारे रोडवर, साहिल एलिगन्स सोसायटीचे समोर, थेरगाव, पिं.चिं. पुणे येथे अंधारामध्ये ४ ते ५ इसम हे थांबले असुन त्यांचेकडे कोणती तरी हत्यारे असुन ते संशयास्पद वाटत आहेत' अशी गोपनीय बातमी त्यांना मिळाल्याने सदर बातमीचा आशय रात्रपाळी अधिकारी श्री. नाईकनिंबाळकर पोलीस उपनिरीक्षक यांना कळविला. त्यांनी सदरबाबत लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जवादवाड यांना माहिती दिली असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरचे इसमांना ताब्यात घेऊन कारवाई करणेस कळविले. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर व तपास पथकातील वरील अंमलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीचे ठिकाणी जाऊन पाहता, सदर ठिकाणी असलेले संशयित इसम हे दबा धरुन बसलेले दिसुन आले. त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते पळण्याचा प्रयत्न करीत असताना तपास पथकातील अंमलदार यांचेसह पोउपनि नाईक निंबाळकर यांनी सापळा रचुन सदर पाच इसमांपैकी ४ इसमांना ताब्यात घेतले व त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे १) शाम हरी गाडवे, वय २१ वर्षे, रा. दळवीनगर, पांढरकरचाळ, आकुर्डी, निगडी, पिं.चिं. पुणे. मुळ रा. शेळगाव-तांदळवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर, २) अतिष भारत सिरसाट, वय १९ वर्षे, रा. लिंकरोड पत्राशेड, म्हसोबा सोसायटी, चिंचवड, पिं.चिं. पुणे. ३) नवनाथ दिगंबर साठे, वय ३५ वर्षे, रा. कैलास कॉलनी, थेरगाव, पिं.चिं. पुणे. मुळ रा. खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापुर, ४) शुभम सिद्राम कांबळे, वय १९ वर्षे, रा. पत्राशेड झोपडपट्टी, भाटनगर, पिंपरी पुणे मुळ रा. कामटी, ता. मोहोळ, जि. सोलापुर असे असुन पळून गेलेल्या आरोपीचे नाव ५) करण ऊर्फ कल्ला टाक, रा. धोबीघाट, पत्राशेड, पिंपरी, पिं.चिं. पुणे असे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातुन ०३ लोखंडी कोयते, मिरची पावडर, एक मोबाईल फोन, एक तीन चाकी अपे टेम्पो व अॅक्सेस कंपनीची मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी करता, ते सर्व मिळुन वाकड परिसरामध्ये असलेल्या बंद दुकाने किंवा मॉल, डिमार्ट तसेच बिल्डींगचे चालु असलेल्या कामाचे ठिकाणाचे साहीत्य व इतर किंमती वस्तु तेथील वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवुन लुटणार असल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन नमुद आरोपींचे विरोधात वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ७९८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९९. ४०२ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) / १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन अटक आरोपीतांना दिनांक २०/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त आहे. त्यांचेकडुन आणखी काही गुन्हे केले आहेत का? तसेच कोठे गंभीर गुन्हा केला आहे का? याचा पोलीस कोठडीदरम्यान अधिक तपास करीत आहोत. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे.
तसेच आज रोजी तपास पथकाचे पो.शि. लोखंडे, पो.ना. गिलबिले हे पोलीस ठाणे हदित प्रतिबंधक गस्त करीत असताना, नीलकमल हॉटेल, मुंबई-पुणे हायवे सर्व्हिस रोड, ताथवडे येथे सकाळी १०.०० वा. चे सुमारास एका बाईकवरील दोन इसमांनी एक इसमाचा जबरीने मोबाईल चोरुन घेऊन पळुन जाताना दिसल्याने पिडीत इसमाकडे चौकशी करून त्या इसमांचा पोलीसांनी पाठलाग केला व जबरी चोरी करणाऱ्या इसमांना चौधरी पार्क, वाकड येथे शिताफिने पकडुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी स्वतःची नावे १) प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव, वय ३० वर्षे २) महेश सुरेश किर्तीकुडाव, वय २७ वर्षे, दोघे रा. बौध्द वस्ती, कोडोली ता. जि. सातारा असे सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन जबरीने चोरी केलेला मोबाईल तसेच गुन्हा करणेसाठी वापरलेली मो.सा.क्र. एमएच ११ डीसी ४८११ इ. मालमत्ता हस्तगत केले आहे. आरोपी प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव याचेवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १) ७७/२०१३ कलम ३९४,३४ भा.दं.वि. २) गु.र.नं. ६०/२०१५ कलम ४५२,३२३, ५०४,४२७ भा.दं.वि. ३) गु.र.नं. १६१/२०१५ कलम ३९४ ३४ भा. दं. वि. अन्वये तसेच ६५ ई मदाका अन्वये ६ केसेस दाखल असुन सदर इसमावर तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३९२, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नमुद आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड, मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शंतनु नाईक निंबाळकर, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोना. अतिक शेख, पोशि रमेश खेडकर व पोना गिलबीले व पोशि लोखंडे यांनी मिळुन केली आहे.
0 Comments