दिनांक २२/०८/२०२३ रोजी सिट्रोन सोसायटी समोर, कैंसनंद रोड वाघोली, ता. हवेली जि.पुणे येथे इसम नामे शैलेश ऊर्फ शैलेंद्र मंडगीकर, वय २२ वर्षे रा लेबर कॅम्प सिट्रोन सोसायटी समोर, केंसनंद रोड वाघोली पुणे मुळ रा. मु. मंडगी, पो. नारंगल बुद्रुक, ता. देगलुर, जि. नांदेड हा त्याचा मित्र नामे राम सुभाष श्रीराम / श्रीरामे, वय २२ वर्षे, रा. मु.पो. बेरळी बुद्रुक, ता. मुखेड, जि. नांदेड व गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे, वय २६ वर्षे, रा. नांदेड नाका, महादेवनगर, जि.लातुर यांचे सोबत दारु पित बसले असताना, शैलेंद्र मंडगीकर व राम श्रीराम / श्रीरामे यांचेमध्ये त्यांनी काम केल्याचे पैसे देण्याच्या व्यवहाराचे कारणावरून भांडणे झाली होती. त्यामध्ये नमुद आरोपींनी संगनमत करून मयत शैलेंद्र मंडगीकर यास जीवे ठार मारून पळुन गेले, वगैरे प्राप्त खबरीवरून लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. ६७५/२०२३, भा.दं.वि. कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपी हे नांदेड येथील रहिवासी असल्यामुळे ते गावी जाण्याची शक्यता असल्याने त्यांना पकडण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे एक पथक नांदेड व तुळजापुर येथे पाठविण्यात आले. आरोपी राम सुभाष श्रीराम / श्रीरामे हा तुळजापुर येथे येताच सपोनि गजानन जाधव, पोलीस अंमलदार, विनायक साळवे, स्वप्निल जाधव यांनी ताब्यात घेवून अटक केली.
नमुद आरोपीकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता दुसरा आरोपी नामे गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे हा लातुर येथे गेल्याची माहिती मिळाल्याने त्याचे मागावर पाठविण्यात आले. परंतु तो पुन्हा वाघोलीच्या दिशेने परत येत असल्याची खबर पोलीस अंमलदार, रितेश काळे यांना प्राप्त झाली असता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस अंमलदार, विनायक साळवे व मल्हारी सपुरे यांनी आरोपीस चोखी ढाणी परिसरातुन शिताफिने गुन्हा घडल्यापासून ४८ तासांच्या आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी यांचा दि.२८/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सीमा ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे, सपोनि गजानन जाधव, सपोनि. शिरिष भालेराव, सपोनि. सोमनाथ पडसळकर, सपोनि. आण्णासाहेब टापरे, सपोनि निखिल पवार, पोउपनि राहुल कोळपे, पोउपनि सुरज गोरे, पोलीस अंमलदार, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, रितेश काळे, सागर जगताप, मल्हारी सपुरे यांनी केली आहे.
0 Comments