दिनांक ०५/०८/२०२३ रोजी फिर्यादी हे टिंबर मार्केट मधील एका ऑफीस जवळ मित्रासोबत गप्पा मारत उभे असताना चार मोटार सायकलवरील टोळी प्रमुख व त्याचे ०९ साथीदार १) राहुल दत्तु शेंडगे, वय २१ वर्षे व त्याचे इतर १० साथीदार यांनी फिर्यादी यांचे जवळ जावून माझ्या भावाला का मारले अशी विचारणा करुन फिर्यादी व त्यांचे मित्रांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन धारधार हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन सदर परिसरात नागरिकां मध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून मोठया प्रमाणात दहशत निर्माण केली. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २७५/२०२३, भा.द.वि.क. ३०७, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) सह १३५, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) राहुल दत्तु शेंडगे, वय-२१ वर्षे, रा. ५४. बी. पी. घर नं. २७०, लोहीयानगर, पुणे २) करण ऊर्फ ठोंब्या भानुदास आगलावे, वय २१ वर्षे, रा. ५४. सी. पी, लोहीयानगर, पुणे ३) लखन भानुदास आगलावे, वय २२ वर्षे, रा. ५४ सी. पी. लोहीयानगर, पुणे ४) महेश इंद्रजित आगलावे, वय २४ वर्षे, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे ५) विशाल ऊर्फ लल्ल्या ऊर्फ लक्ष्मण भारत पारधे, वय २१ वर्षे, रा. पी.एम.सी कॉलनी नं.६, गंजपेठ, पुणे ६) शंकर आण्णा कोंगाडी, वय २५ रा. गल्ली नं. १, लोहीयानगर, पुणे ७) रोहन दत्तु शेडगे, वय २४, रा. ५४, सी. पी. लोहीयानगर, पुणे यांना अटक केली आहे. तसेच दाखल गुन्हया मध्ये एक विधीसंघर्षीत बालक व ०३ पाहिजे आरोपी आहेत.
वरील नमुद आरोपी टोळी प्रमुख राहुल दत्तु शेंडगे यांचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता, याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून, टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी व अवैद्य मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी जबरी चोरी किंवा दरोडा टाकणे धमकी देणे किंवा धाकदपटशा दाखवुन जबरदस्ती करून आपली बेकायदेशीर कृत्ये चालु ठेवुन त्याने व त्याचे इतर साथीदारांनी खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसुन येत असुन, त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत.
दाखल गुन्हयाचे तपासा मध्ये आरोपींनी संघटीतरित्या सदर गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे, पुणे शहर श्री. सुनिल माने यांनी दाखल गुन्हयास मकोका कायदयाप्रमाणे कलमवाढ होणेबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ०१, पुणे शहर श्री. संदीपसिंह गिल यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, यांचेकडे सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २७५/२०२३, भा.द.वि.क. ३०७, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ७ या गुन्हयास महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण सदर प्रस्तावाचे व झाले तपासाचे कागदपत्रांची पडताळणी करुन दाखल गुन्हयास मकोका कायदा कलम ३(१) (।।), ३(२), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर, श्री. अशोक धुमाळ हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे श्री. संदीपसिंह गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, (गुन्हे). श्री. संपतराव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राकेश जाधव, पोलीस उप निरीक्षक, आकाश विटे, अतुल बनकर, पोलीस अंमलदार, महेश पवार, नितीन जाधव, स्वप्नील बांदल यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५४ वी कारवाई आहे.
0 Comments