मुंढवा ओव्हर ब्रिज ते मुंढवा चौक अशी दिनांक १८/०८/२०२३ रोजी ते दिनांक १९/०८/२०२३ रोजी पर्यंत पुणे महानगरपालिका भुसंपादन विभाग यांचेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली. हडपसर खराडी मुख्य रोडवरील मुंढवागाव लगत असलेल्या मुंढवा चौक येथील भुसंपादन जागेवर अतिक्रमण झाल्याने तब्बल ३२ वर्षापासून सदरचे अतिक्रमण कारवाई प्रलंबित होती. सदर कारवाईस स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता.
पुणे शहरातील वाढलेले औद्योगिकरण व मुंढवा-केशवनगर भागामध्ये वाढलेल्या रहदारीमुळे हडपसर-खराडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने सदर भागातील रहीवाशी नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. सदर समस्याचे निरासन करणे करीता पुणे शहर पोलीस व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमानाने स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक कार्यकर्त्ये, कोद्रे, लोणकार, गायकवाड, झुरुंगे इ. स्थानिक परिवारातील नागरिक यांचे सोबत वेळोवेळी चर्चा केली. स्थानिक नागरिकांसोबत झालेल्या चर्चा अंती शंका निरासनानंतर नागरिकांनी कायदेशिर कारवाईस सहकार्य करण्याचे ठरविले.
मुंढवा चौक येथील रोड रुंदीकरण अतिक्रमण कारवाई पुणे पोलीस, महापालिका, अतिक्रमण विभाग, रस्ते विभाग यांचे संयुक्त कारवाई व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व मदतीने अतिक्रमण कारवाई शांततेत पार पडली आहे. सदर ठिकाणच्या अतिक्रमण कारवाईमुळे २४ मीटर रुंद रस्ता पुर्ण झाला आहे. त्यामुळे मुंढवा चौक येथे नेहमीपेक्षा एक लेन वाहतुकीसाठी उपलब्ध झाली असल्याने स्थानिक नागरिक व पुणेकरांची काही प्रमाणात वाहतूक कोडींतून मुक्तता होणार आहे..
सदर कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा मा. महानगरपालिका अति आयुक्त, पुणे मनपा, श्री. विकास ढाकणे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, यांचे मार्गदर्शना खाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे व ११ अधिकारी व ५० अंमलदार तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी श्री.एस.ई. दांडगे, श्री. रनवरे, श्रीमती रूपाली ढगे, हडपसर-मुंढवा क्षत्रिय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर बाळासाहेब ढवळे व इतर अधिकारी व स्टाफ तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्यातून कारवाई ही शांततेत पार पडली आहे.
0 Comments