युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर.चारचाकी गाडयांचे शो-रुम फोडणारी दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद,६ आरोपींना अटक महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील तब्बल २१ गुन्हयांची उकल, करून आरोपींना अटक.

युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर.
चारचाकी गाडयांचे शो-रुम फोडणारी दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद,
६ आरोपींना अटक
 महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील तब्बल २१ गुन्हयांची उकल, करून आरोपींना अटक.

गुन्हे शाखा युनिट ५ कडील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी चारचाकी गाड्यांचे शो-रुम फोडुन घरफोडया चोरी करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने पुण्यासह महाराष्ट्रातील सातारा. कोल्हापुर, अमरावती, ठाणे, नवीमुंबई तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील शिमोगा, विजापुर, रायचुर, बल्लारी आणि गोवा राज्यातील वेरणा येथील शो-रुम फोडुन घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दि.२७/०७/२०२३ रोजी ते दि.२८/०७/२०२३ रोजी दरम्यानचे काळात देवकी मोटर्स एल.एल.पी. स्वामी विवेकानंद रोड ई.एस.आय.सी. हॉस्पीटल समोर बिबवेवाडी पुणे येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने देवकी मोटर्स एल.एल.पी. टाटा मोटर्स शोरूम मधील पॅन्ट्री रुमचे स्लाइडिंग विंडोची मागील लोखंडी जाळी कशाचेतरी सहाय्याने उचकटून, स्लाइडिंग विंडो उघडुन त्यावाटे आत प्रवेश लोखंडी गोदरेज कंपनीच्या तिजोरीतून ४,९६.४९३/- रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १५७/२०२३.भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

नमुद गुन्हयाचा तपास मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर याचे आदेशान्वये युनिट-०५, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत असताना, त्यादरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे येथे सुध्दा तश्याच प्रकारचे गुन्हे घडले असल्याने त्याठिकाणी जाऊन तपास करुन माहिती घेतली.

नमुद गुन्हयाचे दोन्ही घटनास्थळी अविनाश लोहोटे व तपास पथकातील अंमलदार यांनी भेट देऊन साधारण १९ कि.मी. अंतरावरील तांत्रिक विश्लेषणाव्दारे एका संशईत गाडीवरुन मालकाचा नाव व पत्ता हे जळगाव येथील असल्याचे समजले, त्याआधारे जळगाव जिल्हयातील अशा प्रकारे गाडयांचे शो-रुम फोडुन घरफोडी चोरी करणा-या गुन्हेगांराची माहिती घेतली असता सन २०१९ मध्ये अशाप्रकारचे चोरीच्या ०६ घटना झाल्याची माहिती प्राप्त झाली.

त्याअनुषंगाने जळगाव येथील अधिका-यांशी चर्चा करुन गुन्हे शाखा युनिट ५ कडील पोउपनि लोहोटे व तपास पथक हे जळगाव येथे रवाना करुन, त्याठिकाणी गेल्यावर सदर चोरटे हे फिरायला उत्तर भारतात गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर नमुद आरोपीतांचे फोटो व मोबाईल नंबर प्राप्त करुन तपास पथक आरोपींचे मागावर नवी दिल्ली, मथुरा, हरिद्वार शहरात पाठलाग केला असता ते पुन्हा रेल्वेने मुंबईच्या दिशेने गेल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्यानंतर युनिटकडील तपास पथक हे रेल्वेने बांद्रा रेल्वे स्टेशन मुंबई येथे जाऊन सापळा लावुन बातमीच्या आधारे सहा संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची नावे १) सावन दवल मोहिते, वय १९ वर्षे, रा. मु.पो. दहिखेड, ता. अकोट, जि. अकोला व सद्या मु. पो. विचवे, ता. बोधवड, जि. जळगाव २) बादल हिरालाल जाधव, वय १९ वर्षे, रा. आठवडा बाजार मटण मार्केटपाठीमागे, मुक्ताईनगर, जळगाव ३) सोनु नागुलाल मोहिते वय २२ वर्षे, रा. मु.पो. विचवा, ता. बोधवड, जि. जळगाव, ४) अभिषेक देवराम मोहिते, वय २० वर्षे, रा. धानोरा, ता. बोधवड, जि. जळगाव ५) जितु मंगलसिंग बेलदार, वय २३ वर्षे, रा. धानोरा ता. बोधवड, जि. जळगाव ६) पिंटु देवराम चौहान वय १९ वर्षे, रा. मोरुद मरीमाता, ठाणा केजाजी नगर, खांडवा रोड, व्हीक्टोरिया कॉलेज जवळ, इंदोर, राज्य मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले.

त्यांचेकडे केलेल्या कोशल्यपूर्ण तपासात त्यांनी सुमारे २० दिवसापुर्वी बिबवेवाडी पुणे येथील टाटा मोटर्सचे शो-रुमची मागील खिडकीची ग्रील काढुन त्यावाटे आत प्रवेश करुन त्यामधील लोखंडी पैश्याची तिजोरी फोडुन त्यामधील रोख रक्कम चोरल्याचे सांगीतले. म्हणुन त्यांना बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १५७/२०२३.


भा.द.वि. कलम ४५४४५७,३८० या गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये तपास करता त्यांनी भारती विद्यापीठ पो.स्टे. हद्दीमध्ये २१ जुलै रोजी टोयाटो शोरुम व हुंडाई शो-रुम येथे घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यानंतर ते मुंबई बेंगलोर हायवेने कर्नाटक मार्गे गोव्याला जाऊन जात असताना कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हयात कोटे पो.स्टे. हद्दीत तीन शोरुम फोडुन चोरी केली व त्यानंतर गोवा राज्यात जाऊन चोरीच्या पैशात मौजमला केल्यानंतर परतीच्या प्रवासात गोवा येथील वेरना पो.स्टे. हद्दीतील दोन शोरुम फोडुन चोरी केली. आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांचेकडुन एकुण २१ शो-रुम चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन त्यामधील ६,६५,०००/- रु. किचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

वर नमुद आरोपीकडुन उघडकीस आलेले गुन्हे -

१) भारती विद्यापिठ पो.स्टे. गुरंनं. ४६३/२०२३ भादंवि ४५७,३८०

२) बिबवेवाडी पो.स्टे. गुरंनं. १५७/२०२३ भादंवि ४५४, ४५७.३८०.

३) वेरणा पो.स्टे. गोवा गुरंनं ७७/२०२३ भादंवि ३८०, ३४. .

४) वेरणा पो.स्टे. गोवा गुरंनं ७६ / २०२३ भादंवि ४५४, ४५७, ३८०, ४२७ ५) कोटे पो.स्टे. शिमोगा कर्नाटक गुरंनं ७७/२०२३ भादंवि ४५७.३८०.

६) कोटे पो.स्टे. शिमोगा कर्नाटक गुरंनं. ७८/२०२३ भादंवि ४५७.३८०. ७) कोटे पो.स्टे. शिमोगा कर्नाटक गुरंनं. ७९ / २०२३ भादंवि ४५७.३८०, ५११

८) जानानगर पो. स्टे विजापूर कर्नाटक गुरंन. ३३ / २०२३ भादंवि ४५४ ५४७ ३८०

९) जानानगर पो.स्टे. विजापूर कर्नाटक गुरंन ३४ / २०२३ भादंवि ४५४५४७.३८०. १०) जानानगर पो.स्टे. विजापूर कर्नाटक गुरंन. ३५/२०२३ भादंवि ४५४५४७,३८०

११) जानानगर पो.स्टे. विजापूर कर्नाटक गुरंन.३६/२०२३ भादंवि ४५४,५४७,३८०. १२) मार्केटयार्ड पो. स्टे रायचुर कर्नाटक गुरंनं.३८ / २०२३ भादंवि ४५७,३८०

१३) बल्लारी ग्रा.पो.स्टे. बल्लारी कर्नाटक गुरंनं. १७४/२०२३ भादंवि ३८० १४) बल्लारी ग्रा.पो.स्टे. बल्लारी कर्नाटक गुरंनं. १७३ / २०२३ भादंवि ३८०

१५) सातारा शहर पो.स्टे. गुरंन. ३४९ / २०२३ भादंवि ३८०४२७, ४५७ १६) गोकुळ शिरगांव पो.स्टे. कोल्हापूर गुरंनं.८५/२०२३ भादंवि ४५४४५७,३८०

१७) बडनेरा पो.स्टे. अमरावती गुरंनं. ६७५/२०२२ भादंवि ४५७,३८० ३४. १८) खालापुर पो.स्टे. ठाणे गुरन. ९७/२०२३ भादंवि ३९४.३४.

१९) कासारवडवली पो.स्टे. ठाणे शहर गुरंनं. ११७ / २०२३ भादंवि ४५४, ४५७,३८० २०) पनवेल शहर पो.स्टे. नवी मुंबई गुरंनं १९३ / २०२३ भादंवि ४५७,३८०

२१) पनवेल शहर पो.स्टे. नवी मुंबई गुरंनं.२०५/२०२३ भादंवि ४५४, ४५७.३८०

तसेच यातील अटक आरोपी यांचे पूर्व रेकॉर्ड (१) सोनु नागुलाल मोहिते याचेवरील दाखल गुन्हे

१) जळगाव बाजारपेठ पो.स्टे. गु.र.नं. ५५३/२०१९ भादंवि क.४५७.३८०, ३४

२) एमआयडीसी पो.स्टे. जळगाव गु.र.नं. ८५०/२०१९ भादंवि क. ३८०, ४६१, ३४

३) एमआयडीसी पो.स्टे. जळगाव गु.र.नं.८६७/२०१९ भादंवि ३८० ४६१, ३४ ४) एमआयडीसी पो.स्टे. जळगाव गु.र.नं. ८५८/२०१९ भादंवि ३८०, ४६१.३४

५) नसेराबाद पो.स्टे. जळगाव गु.र.नं. १०७/२०१९ भादंवि ४५४४५७३८०

६) नसेराबाद पो.स्टे. जळगाव गु.र.नं. ११०/२०१९ भादंवि ४५७,३८० ५११ ७) वापी पो.स्टे. गुजरात, गु.र.नं. / २०१९ भादंवि ४५७,३८०

२) बादल हिरालाल जाधव याचेवरील दाखल गुन्हे

१) एमआयडीसी पो.स्टे. जळगाव गु.र.नं.८६७/२०१९ भादंवि ३८०.४६१.३४

२) क्रांतीचौक पो.स्टे. औरंगाबाद गु.र.नं.१८८/२०१९ भादंवि ३८०, ४५७,४६१.३४

(३) पिंटु देवराम चौहान याचेवरील दाखल गुन्हे

१) एमआयडीसी पो.स्टे. जळगाव गु.र.नं.८६७/२०१९ भादंवि ३८०.४६१.३४

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमलदार, चेतन चव्हाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाऊद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अश्रुबा मोराळे, शहाजी काळे, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, संजयकुमार दळवी, राहुल होळकर यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments