येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.बाळकृष्ण कदम.आरोपींना पळून जात असताना शिताफीने पकडले,जबरी चोरी करणारे सराईत आरोपी यांना केले जेरबंद.


दि. २२/०८/२०२३ रोजी फिर्यादी हे दुचाकीवरुन रामवाडी पुणे येथे जात असताना रोडचे कडेला थांबले असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील इसमांनी फिर्यादी यांचे पॅन्टचे खिशातील २५,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेवून गेले आहेत. म्हणून येरवडा पो. स्टे. गु.र.नं. ५७९/ २०२३ भादवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार, प्रशांत कांबळे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा महंमदवाडी वानवडी भागात येणार आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, सागर जगदाळे, अमजद शेख, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, अनिल शिंदे यांनी बातमीचे ठिकाणी जावून संशईत इसमांना पळून जात असताना शिताफीने पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्यांचे नांव १. अस्लम उर्फ बिल्ला इस्माईल शेख, वय २० वर्षे, रा. चिंतामणी नगर, हडपसर, पुणे २. विलाल इस्माईल शेख, वय २१ वर्षे, रा. सैय्यदनगर हडपसर, पुणे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता त्यांनी चोरी केल्याचे कबूल करुन गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि. २३/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले १०,०००/- रुपये रोख व ६०,०००/- रु किमतीची मोटार सायकल असा एकूण ७०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी विश्रामबाग येथे २०,०००/- रु जबरदस्तीने चोरल्याचे व विश्रांतवाडी येथे ३०,०००/- रु चोरी केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीकडून खालील ०२ जबरीचोरी व ०१ चोरी असे एकूण ०३ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण ८०,०००/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१. येरवडा पो स्टे गुरनं. ५७९ / २०२३ भादवि ३९२ ३४ विश्रामबाग पो स्टे गुरनं. १८३ / २०२३ भादवि ३९२ ३४

२.

३. विश्रांतवाडी पो स्टे गुरनं. २३५ / २०३३ भादवि ३७९ ३४

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ४, श्री. शशिकांत बोराटे मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, श्री. संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पो स्टे पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments