सदरचा गुन्हा तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी केला आहे. विधीसंघर्षीत बालकांकडुन एकूण १,२०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत.
दिनांक ०२/०८/२०२३ रोजी फिर्यादी,रा आंबेगाव पठार पुणे यांचे कोणीतरी अज्ञात इसमाने राहते घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले १,४५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५०६/२०२३, भा.द.वि. कलम ४५४,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे..
सदर दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथक हे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना घटनास्थळाचे तांत्रीक विश्लेषण, तसेच घटनास्थळापासून ठिकठिकाणच्या कॅमेराची पाहणी करुन सदर गुन्हयाचा कसून तपास करीत असताना पोलीस अमंलदार महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फतीने सदरचा गुन्हा तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी केला आहे. त्यानुसार त्या तीन बालकांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५०६ / २०२३ भादवि कलम ४५४,३८० या गुन्हयातील सुमारे ९०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४०४ / २०२३ भादवि कलम ४५४,३८० या गुन्हयातील ३०,०००/- रुपये किंमतीची महागडी घरगुती भांडी हस्तगत करण्यात आली आहे.
तरी विधीसंघर्षीत बालकांकडुन एकूण १,२०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व महागडी घरगुती भांडी हस्तगत करण्यात आली असुन त्यांचेकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेशकुमार, मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, वर्षा घोगरे, पोलीस अंमलदार महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, सचिन सरपाले, मंगेश पवार, हर्षल शिंदे, शैलेश साठे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments