सन २०२१ पासुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सुमारे ०२ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद.

युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर
आरोपी प्रफुल्ल कोळी हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे २ वर्षापासुन फरार होता.


दि. १४/०९/२०२० रोजी ते डिसेंबर २०२० रोजी पर्यंत फिर्यादी यांना इसम नामे प्रफुल्ल कोळी यांनी स्वतःच्या मालकीची मासेमारी बोट नसताना ती स्वतःची आहे असे भासवुन, मुळ मालकाच्या आपरोक्ष ती बनावट विक्री कराराच्या आधारे रुपये ३,८०,०००/- फिर्यादी यांचेकडुन घेवुन फसवणुक केल्याबाबत कुलबा पोलीस ठाणे मुंबई गुन्हा नोंद क्र. ३२६ / २०२१, भादवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी प्रफुल्ल कोळी हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०२ वर्षापासुन फरार होता.
दि. १५/०८/२०२३ रोजीचे स्वातंत्रदिन निमित्त कोम्बींग ऑपरेशनचे दरम्यान युनिट - १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट-१ च्या हद्दीत हॉटेल, लॉजेस चेक करण्याकरीता समर्थ पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीतील राजधानी हॉटेल येथे आले होते. त्यावेळी तेथील हॉटेलचे रजिस्टर चेक करत असताना प्रफुल्ल कोळी, रा. ता. अलिबाग, जि. रायगड असे नाव रजिस्टर मध्ये नोंद होती. पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने पोलीस अंमलदार, निलेश साबळे यांनी त्यांचे मोबाईल मध्ये एका अप्लीकेशन मध्ये सदर इसमाचे नाव टाकून चेक केले असता, कुलबा पोलीस ठाणेकडील गुन्हा नोंद असलेबाबत दिसुन आले. सदर राजधानी हॉटेलचे मॅनेजर यांना घेवुन हॉटेल मधील रुममध्ये जावुन सदर इसमाचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव प्रफुल्ल जयवंत कोळी, वय ३० वर्ष, रा.मुं.पो. रेवस- सारळ, ता. अलिबाग, जि. रायगड असे सांगितले. त्यास दाखल गुन्हयाबाबत विचारणा करता तो उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीता बाबत प्रथम कुलबा पोलीस ठाणेकडील पोलीस अभिलेख पाहणी करता, गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात पाहिजे आरोपी मध्ये त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसमाकडे अधिक चौकशी करता, त्याने सदर गुन्हयाबाबत कबुली दिली आहे. आरोपीस पुढील कारवाईकामी कुलबा पोलीस स्टेशन, मुंबई यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे - १, श्री. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद, पोउनि सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार, निलेश साबळे, अजय थोरात, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, अभिनव लडकत, आण्णा माने व महेश बामगुडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments