वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
जबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे एकत्रीत गुन्हे केलेले आहेत..
दिनांक ०८/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे केदारी गार्डनचे गेट समोर वानवडी, पुणे येथे पार्किंग मध्ये त्यांची गाडी पार्क करून गेट समोर आले असता एका काळया रंगाच्या बाईक वर आलेल्या दोन अज्ञात इसमानी फिर्यादीचे गळयातील २५,०००/- रू किचे सोन्याच्या मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळुन गेले. म्हणुन फिर्यादी यांनी अज्ञात मोटारसायकलवरील इसमा विरूद्ध फिर्याद दिल्याने वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६२ / २०२३ भादंविक ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी नामे १) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण, वय
२२ वर्षे, रा. देवाची उरुळी धनगर वस्ती, मंतरवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव- खुनेश्वर, ता. मोहोळ, जि.सोलापूर ( टोळी प्रमुख) २) गजानन दत्तराव बोहाडे / बोराडे, वय ३० वर्षे, रा. हिवरकर मळा,बिल्डींग फ्लॅट नं. ०२, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे (टोळी सदस्य) हे निष्पन्न झाले असुन त्यांना दाखल
गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
वरील आरोपीची पूर्व रेकॉर्ड पाहणी करता यातील आरोपी नामे १) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण (टोळी प्रमुख) यांचेविरूध्द १६ गुन्हे दाखल असुन दोन्ही आरोपीनी एकत्रीत एकूण ०८ गुन्हे केलेले आहेत. त्यांनी पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीत चैन स्नॅचिंग व मंगळसूत्र चोरीचे असे गुन्हे हे एकटया दुकटया महिलांना गाठुन, त्यांना धक्का देवून त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन इत्यादि जबरदस्तीने चोरी करुन महिलांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य करून स्वतःचे अस्तीत्व लपविण्यासाठी वेळोवेळी त्यांनी वेग-वेगळया प्रकारचा पेहराव करून व वेग-वेगळ्या मोटार सायकलचा वापर करून अशा प्रकारचे जबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे एकत्रीत गुन्हे केलेले आहेत..
दाखल गुन्हया मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii).३ (२), ३(४) चा अंतर्भाव करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. भाऊसाहेब पटारे यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-०५, पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६२/२०२३ भादंविक ३९२.३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी पुर्वमान्यता दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. शाहुराजे साळवे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे श्री. भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री विनय पाटणकर, पोलीस उप-निरीक्षक, अजय शितोळे, संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक ज्ञानदेव शेलार, पोलीस अंमलदार, मनोज साळुंखे, अमोल घावटे, उत्तरेश्वर धस यांनी कारवाई केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ४७ वी कारवाई आहे.
0 Comments