पी. सी. बी. गुन्हे शाखा पुणे शहर.
मागील ५ वर्षामध्ये तीचेविरूध्द ८ गुन्हे दाखल आहेत,
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये ३९ वी स्थानबध्दतेची कारवाई
पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणारी अट्टल महिला गुन्हेगार सौ. सुमन संजय कडमंची, वय ४१ वर्षे, रा. स.नं. ८९ /अ, २६१, समर्थनगर हिंगणे मळा हडपसर, पुणे ही अभिलेखावरील सराईत महिला गुन्हेगार आहे. तीने तीच्या साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर भेसळयुक्त ताडी विक्री करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये तीचेविरूध्द ०८ गुन्हे दाखल आहेत. तीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
हडपसर पोलीस स्टेशन यांनी सादर केलेला प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले असून, त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्कालीन हडपसर पोलीस स्टेशन, श्री. अरविंद गोकुळे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. रविंद्र शेळके व हडपसर पोलीस स्टेशन कडील स्टाफ व पोलीस उप निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. राजु बहिरट यांनी कामगिरी पार पाडली.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाऱ्या तसेच अवैध बेकायदेशीर भेसळयुक्त ताडी निर्मीती व विक्री करणाया अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम. पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ३९ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
0 Comments