सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
एका महिन्यात दामदुपटीने पैसे मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करुन नेलेले सोन्याचे दागिने जप्त करुन आरोपीतास केले जेरबंद.
माहे एप्रिल २०२२ मध्ये वर्तमान पत्रामध्ये आलेल्या जहिरातीवरील मोबाईल नंबरवरून फिर्यादी यांनी त्याचेवर संपर्क साधला असता, मोबाईलधारकाने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मी केलेल्या प्लॉटिंग मध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला एका महिन्यात दामदुपटीने पैसे मिळवुन देतो असे सांगुन तुमच्याकडील सोन्याचे दागिने मला दया. मी त्यावर लोन काढुन ते पैसे गुंतवितो असे सांगुन त्यांना विश्वासात घेवून फिर्यादीकडुन १९ तोळे सोन्याचे दागिने व रोख ३,५०,०००/- रुपये घेवुन आरोपी हा मागील एक वर्षापासुन सदरचे पैसे व सोने घेवुन, स्वतःचे अस्तिव लपवुन फिर्यादी यांना गुंगारा देत होता. सदरबाबत आरोपी आनंद पावसकर व प्रथमेश पावसकर याचेविरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि नंबर २६९ / २०२३, भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत असताना, तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारमार्फत आरोपीचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार, अमोल पाटील, देवा चव्हाण, शेडगे यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की नमुद गुन्हया तील पाहीजे आरोपी आनंद नारायण पावसकर, वय-३६, रा. तिरुपतीनगर, वारजे नाका, वारजे पुणे हा मुं.पो. डाळींब, ता, दौड, जि. पुणे या ठिकाणी आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळवुन सहा.
पोलीस निरीक्षक, सचिन निकम व स्टाफ असे मिळाले बातमीप्रमाणे पाहीजे आरोपी आनंद पावसकर याचा
सदर भागा मध्ये शोध घेता तो सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यास सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे येथे
आणुन त्यास दिनांक २२/०७/२०२३ रोजी अटक केली आहे. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने वरील
गुन्हयातील फसवणुक करुन नेलेले किंमत रुपये ९,३०,०००/- किचे १९ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
केले आहे. पुढील तपास सपोनि. सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त, पुणे शहर, श्री. सुहेल शर्मा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक, आबा उतेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, नलीन येरुणकर यांचे पथकाने केली आहे.
0 Comments