वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयासमोर नागरिकांच्या समस्यांबाबत बोंबाबोंब आंदोलन

काल दिनांक 28 जुलै 2023 रोजी वंचित बहुजन आघाडी हडपसर विधानसभेचे सामाजिक कार्यकर्ते *जीवन तात्या फडके यांच्या नेतृत्वामध्ये वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय  कार्यालयासमोर नागरिकांच्या समस्यांबाबत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेत वानवडी-रामटेकडी  क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तारू साहेब हे स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले* तसेच मागण्यांची पूर्तता करून लगेच कामाला सुरुवात करण्याचे आदेश तारू साहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले.

 संध्याकाळपर्यंत रामटेकडीमधील पावसामुळे उनमळून पडण्याची शक्यता असलेले झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या व इतरही कामास आज सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित राहून नागरिकांच्या मागण्या सहाय्यक आयुक्त तारूसाहेब यांच्यामार्फत मान्य करून घेण्यात आल्या...

*स्वप्निल वाघमारे*
*सचिव. पुणे शहर*
*वंचित बहुजन आघाडी*

Post a Comment

0 Comments