जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून चोरी करणा-या परराज्यातील दोन महिलांना केले शिताफिने अटक

दिनांक - १७/०७/२०२३
शिवाजीनगर पो स्टे पुणे शहर
जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून चोरी करणा-या परराज्यातील दोन महिलांना केले शिताफिने अटक

दिनांक २५/०६/२०२३ रोजी सायंकाळी दोन अनोळखी महिला यांनी मॉडेल कॉलनी भागात जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घरोघरी फिरत होत्या. यातील फिर्यादी यांना त्यांचे काही जुने कपडे विकणे असल्याने, त्यांनी सदर महिलांना बोलावले असता, आरोपी महिला यांनी भुक लागली असल्याने आम्हाला जेवण मिळेल का अशी भावनिक साथ घातली. त्यानुसार फिर्यादी महिलेने त्यांना घरात बोलावून जेवण दिले. आरोपी महिला हया जेवण करत असताना त्यांनी फिर्यादीचे घरातील वस्तुंची रेकी केली व जेवण संपवून बाहेर गेल्या.

त्यानंतर फिर्यादी या महिला घराबाहेर जाण्याची वाट पाहत घराबाहेर लपुन बसले. फिर्यादी महिला हया घराबाहेर गेल्याचे पाहताच त्यांनी पुन्हा घरात प्रवेश करून सोन्याच्या दोन अंगठी, एक मोबाईल व ६०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकुण १,२०,०००/- रुपये किचा ऐवज घेवुन आरोपी महिला हया पसार झाले. त्याअनुशंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १२४ / २०२३ भादवि कलम ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निराक्षक श्री. अरविंद माने यांनी सायबर विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक, बाजीराव नाईक व तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक, निसार शेख, पोलीस अंमलदार, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांना तपास करणेबाबत महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. त्या नुसार त्यांना त्यांचे गुप्त बातमीदाराद्वारे व तांत्रिक माहितीचे विश्लेषन करून चोरी करणा-या महिला हया सासवड भागात असल्याचे समजले.

सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवून, वरिष्ठ पोलीस निराक्षक, श्री अरविंद माने यांनी तात्काळ सासवड येथे महिला पोलीस अंमलदारासह त्यांचे पथक रवाना करून आरोपी महिला नामे १) मिराबेन सुनिल सोळकी, वय ३५, रा. खंडोबानगर, सासवड, पुणे २) गिता विजय कांगिया, वय ४५, रा. खंडोबानगर, सासवड, पुणे, मुळगांव- रा. साबरमती, गुजरात यांना ताब्यात घेवुन अधिक चौकशीकामी पोलीस स्टेशन येथे आणले. दाखल गुन्हया बाबत विश्वासात घेवून, त्यांचेकडे चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा त्यांनी केल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेला मोबाईल फोन व २५,०००/- रुपये रोख रक्कम त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक, निसार शेख हे करीत आहेत. सदर

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - १, पुणे, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे, श्री. वंसत कुंवर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक, निसार शेख, पोलीस अंमलदार, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments