राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन फरार घोषित केलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलीसांनी केले जेरबंद

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन फरार घोषित केलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलीसांनी केले जेरबंद

दिनांक १८/०७/२०२३ रोजी शास्त्रीनगर बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार, प्रदिप चव्हाण व अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत असताना, रात्री ०२/३० वा. त्यांनी तीन संशईत दुचाकी चोरांना ताब्यात घेवुन रात्रपाळीचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक, प्रविण कुलकर्णी यांना कळविले. त्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदार, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांची टिम तयार करून, संशईत इसमांना घरझडतीसाठी नेण्यात आले. घरझडती मध्ये एक जिवंत काडतुस चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळुन आली. त्यामध्ये संशईल हे देशविघातक कृत्यास सहभागी असल्याचा संशय आल्याने, अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेविरूध्द कोथरूड पो स्टे येथे गुरनं. १७५/ २०२३, भा.दं.वि.सं. कलम ४६८, ३७९, ५११, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलिस अॅक्ट क. ३७ (१) ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ०३, पुणे. श्री. सुहेल शर्मा यांनी वरील कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे बोलावुन त्यांना पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सन्मान केला आहे. तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments