सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर
इझी पे प्रा. लि. येरवडा, पुणे या कंपनीची ३.५ कोटी रुपयांची फसवणूक करणा-या नोंदणीकृत अटक एजंटाचे अन्य साथिदारास अटक केलेबाबत
इझी पे प्रा. लि. येरवडा, पुणे ही कंपनी भारतभर ऑनलाईन पेमेंटची सुविधा जनतेस पुरविण्याचे काम करते. सदर कामाकरीता नमुद कंपनीचे भारतभर नोंदणीकृत एजंटची नेमणूक केलेली आहे व त्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. दिनांक ११/०८/२०२२ रोजीपासून नमुद कंपनीतील नोंदणीकृत असलेल्या एजंटांपैकी ६५ एजंट यांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅप व्दारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या मोबाईल व्यतिरिक्त दोन ते चार व त्यापेक्षा जास्त वेगवेगळया मोबाईल संचांचा वापर करुन अनधिकृतपणे सदर मोबाईल व्दारे लॉग ईन आयडीने लॉग ईन करुन कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला व कंपनीचे व्हीपीए खात्यामधून अन्य ४४ बँक खात्यावर एजंटचे कमिशन व्यतिरिक्त ३,५२,७०,२१०.८२/- रुपयांची कंपनीची फसवणूक केली. म्हणून दिले तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. २० / २०२३ भा.दं.वि. कलम ४१९, ४२० ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३ / ६६, ६६ डी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सायबर पोलीस स्टेशन कडून सदर गुन्हयातील प्राप्त माहितीचे तांत्रीक विश्लेषण करुन सदर गुन्हयातील संशयित आरोपी नामे अंकित कुमार अशोक पांडे, वय २० वर्षे, रा. अरविंद मिश्रा यांचे घर, सी / १८, निबे दितो पार्क, ममरा, दुर्गापूर, बर्धमान, पश्चिम बंगाल येथून दिनांक १२/०७/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती. नमुद आरोपीताकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास सुरु होता. त्यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, अटक आरोपीताचा अन्य साथीदार छोटू हा दिनांक २२/०७/२०२३ रोजी शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात येणार आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद परीसरात सापळा रचला असता आरोपी नामे छोटू उर्फ एजाज आलम वडील नामे जिआऊल अन्सारी वय २८ वर्षे, रा. कुरमेडी बाजार, सहजानंद शाळेजवळ, बोकारो स्टील सीटी, बालीडी, झारखंड, मुळ रा.रेगनीया, पोस्ट झरी, थाना आसम, गया, बिहार हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे आणले. नमुद इसमाकडे केले तपासात त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीताकडून दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. नमुद आरोपीतास मा. न्यायालयाने दिनांक ३१/०७/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री.. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री. अप्पासाहेब शेवाळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील, पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, निलेश लांडगे, शाहरूख शेख, किरण जमदाडे, बाबासाहेब कराळे व आनंदराव मंडलकर या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली आहे.
0 Comments