बुलडाणा, आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने मणिपूरच्या घटनेचा निषेध करीत, दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
मणिपूर येथील महिलांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून आज बुलडाण्यातही या घटनेविरूध्द विविध सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला. काही सामाजिक संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून दोषींना फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने मणिपूरच्या घटनेचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी स्थानिक नेताजी सुभाषचंद्र बोस, (संगम चौक बुलढाणा) येथे रस्ता रोको केला. मणिपूर येथील दोन महिलांची जमावाने नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण देशच हादरला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर
सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवले जात असल्याचे दिसत आहे.दरम्यान मणिपूरच्या या लज्जास्पद घटनेविरूध्द बुलडाणा जिल्हयातही संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा विविध सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला.आझाद हिंद महिला संघटनेने , दोषींना फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवित आझाद हिंद महिला संघटनेने संगम चौकात बुलढाणा, काही वेळ रस्ता रोखून धरला होता. सोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील ५० विद्यार्थी संख्या असलेल्या प्रमुख गावांमध्ये शालेय बस सुरू करावी. शहरातील रस्ते नाल्या स्वच्छता अभियान सुरू करावे. शहरात सीसीटीव्ही उन्नाव बसवावे. गहाळ आणि अपहरण झालेल्या महिला मुलींसाठी स्वतंत्र पथक नेमावे. अनधिकृत कॅफे बंद करावे. यासह प्रमुख मूलभूत नागरिक सुविधांच्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ( संगम चौक बुलढाणा,) येथे अॅड. सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने रस्ता रोको, धरने आंदोलन करण्यात आले होते.
0 Comments