दरोडा, जबरी चोरी, चैन चोरी सारखे गंभीर गुन्हे करणारे आंतर जिल्हा टोळीतील अमोल भास्कर शेलार (टोळी प्रमुख) व त्याचे तीन साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

दरोडा, जबरी चोरी, चैन चोरी सारखे गंभीर गुन्हे करणारे आंतर जिल्हा टोळीतील अमोल भास्कर शेलार (टोळी प्रमुख) व त्याचे तीन साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई

यातील फिर्यादी वय ७४ वर्षे रा.मांजरी बु पुणे ह्या दि. २०/०६/२०२३ रोजी सकाळी मार्निंग वॉक करुन राहते घराचे समोर पार्कीगमध्ये आले असताना तीन अनोळखी इसम एका दुचाकीवरुन त्यांच्या जवळ येवुन त्यांना पत्ता विचारत असताना सदर मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची मनीमाळ जबरदस्तीने हिसका मारुन निघुन गेले त्यावरुन हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९०२ / २०२३ भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करता दाखल गुन्हा हा दरोडा, जबरी चोरी, चैन चोरी सारखे गंभीर गुन्हे करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार अमोल भास्कर शेलार व त्याचे टोळीतील सदस्य यांनी केलेचे निष्पन्न झाले. त्यावरुन यातील अटक आरोपी (१) अमोल भास्कर शेलार वय २५ वर्षे रा. नेवासा फाटा मुंकिदनगरट बजरंगनगर नेवासा अहमदनगर, (टोळी प्रमुख) (२) स्वप्नील ऊर्फ भावडया ईश्वर केंदळे वय २९ वर्षे रा. संभाजीनगर, नेवासा, अहमदनगर (टोळी सदस्य ) (३) अमर चिल्लु कांबळे वय अंदाजे ३५ वर्षे रा. मुंकिदनगर, नेवासा, अहमदनगर (टोळी सदस्य ) (४) विजय रामकृष्ण देडगावकर वय ६३ वर्षे रा. मु.पो. कोल्हार ता. राहता जि.अहमदनगर (सोनार रिसीव्हर) (टोळी सदस्य) या आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणुन व अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे इतर फायद्याकरीता सदरचा गुन्हा केलेचे दिसुन आलेने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि.नं.१०२ / २०२३ भादंवि कलम ३९२. ३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२)३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख-केदार हया करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा.सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख-केदार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवले, सहा. पो. निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहा.पो.निरीक्षक दिपक बर्गे, पोलीस उप-निरीक्षक अविनाश शिंदे, हडपसर तपास पथक तसेच निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, संदिप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश उबाळे, मपोना खैरे, राकेश चव्हाण, बाबासाहेब शिंदे, वसिम शेख यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन, शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ३८ वी कारवाई आहे.

Post a Comment

0 Comments