संघटीत गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारे यांच्यावर गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई.

खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर.
संघटीत गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारे  यांच्यावर गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक दि.३०/०६/२०२३ रोजी दुपारी ०४/०० वा. चे सुमारास बापोडी येथील राहते घरातुन भाजीपाला आणणेकामी फिर्यादी नामे, पवन पवरचंद घागट, वय ४६ वर्षे, चंदा-नोकरी, रा. बोपोडी, पुणे हे बाजारात जात असताना बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले असताना त्यांचे मागुन एक अॅक्टीव्हा मोपेड गाडीवर बसुन आरोपी नामे, गणेश विष्णु अडागळे उर्फ सुद्री गण्या व त्याचे इतर साथिदार असे त्यांच्या लाईन तोडुन येवुन यातील फिर्यादीच्या गाडीचा धक्का दिले, त्यास जाब विचारता त्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करुन आम्ही या एरियाचे भाई आहोत तु ओळखत नाही काय असे म्हणुन अॅक्टीव्हा वरील चालकाने त्याचे कमरेला शर्टच्या खाली ठेवलेला कोयता काढुन त्या कोयत्याने फिर्यादीचे डोक्यावर वार केला तो वार फिर्यादीने चुकवला असता त्याचे कानासा लागुन इजा झाली. तसेच त्यांने त्यांचेकडील कोयता हवेत फिरवुन तेथे उपस्थित लोकांना दमदाटी केली होती. सदरबाबत खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि न १९५/२०२३ भा. द. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४(२५) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या, वय २० वर्षे, रा. बापु काटे चाळ, वार्ड क्र. ३. दापोडी, पुणे, (टोळी प्रमुख) २) इम्रान गफार शेख, वय १६ वर्षे ९ महिने, रा. मुन्सिपल्टी चाळष सिध्दार्थनगर, लोणावळा (विधीसंघर्षीत), ३) अली वसीम खान, वय १६ वर्षे ८ महिने, रा. पवार वस्ती. नालंदा बुध्द विहाराजवळ, दापोडी, पुणे (विधीसंघर्षीत) हे आरोपी असुन ते रेकॉर्डवीरल गुन्हेगार आहेत. त्यांचेविरुध्द यापूर्वी जबरी चोरी, प्राणघातक हल्ले करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश विष्णु आडागळे उर्फ सुंद्री गण्या वय २० वर्षे, रा. बापु काटे चाळ, वार्ड क्र. ३. दापोडी, पुणे, याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन त्यांनी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठएवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील जुमानत नसलेने तसेच त्याचे वर्तनात सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२). ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांनी मा. शशिकांत बोराटे,

पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन शर्मा यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरिल टोळीविरुद खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं. १९७ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६,३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५), सह क्रिमिन ली अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) ३ सह १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२)३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन शर्मा, मा. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ मा आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त. खडकी विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र सहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. आणा गुंजाळ, पोलीस उप निरीक्षक श्री. संतोष भांडवलकर, पोलीस उप निरीक्षक, सर्वेलन्स अंमलदार राजकिरण पवार, रमेश जाधव यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही वी कारवाई आहे. 


राजेंद्र सहाण,पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर.

Post a Comment

0 Comments